CAA : मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशभरात लागू होणार CAA? ऑनलाईन पोर्टल तयार, नोंदणीसाठी कोणत्या कागदपत्राची असेल गरज?

CAA Notification: लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.
Amit Shah on CAA
Amit Shah on CAASaam Tv
Published On

CAA Documents For Online Registration :

देशात लवकरच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होऊ शकता असा दावा माध्यामातून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.(Latest News)

दरम्यान यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याविषयी सुतोवाच केले होते. सीएएचे नियम आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी केले जातील. लाभार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे गृहमंत्री (Home Minister) अमित शाह (Amit Shah) म्हणाले होते.

रिपोर्टनुसार, CAAसाठीचे सर्व नियम तयार करण्यात आलेत. नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टलदेखील तयार करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि अर्जदार त्यांचा मोबाईल फोनवरून नागरिकत्वासाठी अर्ज करू शकणार आहे. अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CAA अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळामुळे भारत आलेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरित्व मिळणार आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये CAA संसदेत मंजूर झाला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची संमतीदेखील मिळाली होती. पण देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. ४ डिसेंबर २०१९ रोजी संसदेत विधेयक मांडले गेले तेव्हा आसाममध्ये पहिल्यांदा निदर्शने सुरू झाली. यानंतर ही निदर्शने दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये पसरले. निदर्शनांमुळे २७ मृत्यू झाले, त्यापैकी २२ एकट्या उत्तर प्रदेशात झालेत. एक हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. आंदोलकांवर ३०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेत. या सर्व विरोधामुळे हा कायदा लागू करण्यात उशीर झाला.

Amit Shah on CAA
PM Modi Maharashtra: पीएम मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; १३०० कोटी रुपयांच्या रेल्वे प्रोजेक्टचे उद्घाटन, शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार २१ हजार कोटी रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com