रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये चोरट्यांनी एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र गॅस कटरने एटीएम फोडल्यामुळे मशीनमधले दहा ते पंधरा लाख जळून खाक झाले आहेत
छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) माळीवाडामध्ये हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेले एटीएम मशीन २ चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळे एटीएमला (ATM) आग लागली होती. यामुळे आगीत मशीनमधील १० ते १५ लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शिवाय चोरट्यानी एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फोडण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु आजूबाजूच्या व्यक्तींना जाग आल्याने चोरट्याने त्या ठिकाणाहून पलायन केले. दरम्यान हा सगळा प्रकार सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला आणि त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत (Police) पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.