Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना त्रास; शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

Nanded news : नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत शिकण्यासाठी दाखल मुला- मुलींना निवासाची देखील व्यवस्था आहे
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या दूषित पाणी पिण्यात आले. हे पाणी प्यायल्यामुळे त्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी आजाराची लागण झाली. विद्यार्थ्यांनींना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nanded News
Konkan Railway: कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका; दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे मोठे हाल

नांदेडच्या (Nanded) हिमायतनगर तालुक्यात शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत शिकण्यासाठी दाखल मुला- मुलींना निवासाची देखील व्यवस्था आहे. राहण्यासोबत त्यांना सर्व सुविधा दिल्या जातात. (Ashram School) दरम्यान येथे वास्तव्यास असलेल्या मुलींना पिण्याच्या पाण्याची साठवणूक केली जात असते. हे पाणी दूषित असून हे पाणी विद्यार्थिनींच्या पिण्यात आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने आलेल्या दूषित पाण्यामुळे काही मुलींना उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Nanded News
Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर धडकली; तरुणाचा मृत्यू, तीनजण जखमी

सदरचा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून शाळेत सुरू असून संबंधित शाळा प्रशासनातील अधीक्षक, मुख्याध्यापक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. या शाळेतील एकूण सात विद्यार्थ्यांनींना (Student) दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळीचा त्रास झाला. सध्या या विद्यार्थ्यांनींची प्रकृती स्थिर आहे. शाळेत अद्याप कुठलाही आरोग्य पथक पोहचले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com