Petrol Diesel Rate: देशात पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? एका क्लिकवर वाचा तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Rate 26th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel Rate TodaySaam TV
Published On

देशभरात पेट्रोल डिझेलचे रोज नवे दर अपडेट होत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांत काहीच बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर देशातील इंधन कंपन्या सकाळी ६ वाजता दर अपडेट करत असतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७८.२४ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८२.२४ डॉलरवर विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून बदल नाहीये. त्यामुळेच पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे.तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.

Petrol Diesel Rate
Government Scheme For Startup: तरुणांनो स्वतः चा बिझनेस सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनांमधून मिळतेय आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.२९ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.८९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.४० रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७४ रुपये आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल १०५.०९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९१.५९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

Petrol Diesel Rate
Budget 2024 Announcement: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी ५ महत्वाच्या घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com