

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी
एप्रिलमध्ये मिळणार तीन महिन्याचे मोफत धान्य
केंद्र सरकारने दिले आदेश
सरकारने रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील सर्व लोकांना मोफत धान्य देते. आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तीन पट रेशन मिळणार आहे.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की, एप्रिलमध्ये सर्व लाभार्थ्यांनी तीन महिन्याचे धान्य एकत्र मिळणार आहे. एप्रिल, मे आणि जून या कालावधीचे धान्य एकत्र मिळणार आहे. सर्व लाभार्थी आपल्या वेळेनुसार रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतात. दरम्यान, सरकारने हा निर्णय का घेतला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी केंद्राने राज्य सरकारला दिली होती सूचना
काही दिवसांपूर्वी केंद्राने सर्व राज्य सरकारला रेशनबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. जून महिन्यापर्यंतचे धान्य आगाऊ स्वरुपात केंद्राकडून घेण्यास सांगितले होते. केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्यास सांगितले होते. यामागचे कारण म्हणजे पुढच्या काही आठवड्यात केंद्र सरकार नवीन गहू खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधीच तीन महिन्याचे धान्य घेऊन ठेवावेत. जेणेकरुन नवीन धान्य ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध होईल.
रेशन कार्डवर नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. गहू आणि तांदूळ मिळतात. दर महिन्याला तुम्ही हे धान्य घेऊन जाऊ शकतात. मात्र, आता एप्रिलमध्ये तुम्हाला तीन महिन्याचे रेशन एकत्र मिळणार आहे. यामागे नेमक कारण काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.