UMANG App
Ration Card Onlinegoogle

Ration Card Online: घरबसल्या बनवा रेशन कार्ड! मोबाईल अ‍ॅपवरच होईल पूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

UMANG App: घरबसल्या रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. उमंग अॅपद्वारे काही क्लिकमध्ये अर्ज करा आणि शासकीय सेवांचा लाभ घ्या, वेळ आणि श्रम वाचवा.
Published on

देशात अजूनही अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांना दोन वेळचं अन्न मिळणवं कठीण झालेलं आहे. अशा गरजू आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी भारत सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे.

पूर्वी रेशन कार्ड मिळवण्यासाठी लोकांना शासकीय कार्यालयांचे चकरा माराव्या लागायच्या. मग अनेकदा महिनोन्‌महिने प्रतीक्षा करावी लागते. पण आता ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी आणि डिजिटल झाली आहे. केंद्र सरकारने आता नागरिकांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या राशन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा दिली आहे.

UMANG App
Liver Health: लिव्हरमधील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर निघतील; फक्त ‘ही’ ३ फळं रोज खा, फॅटी लिव्हरची समस्या राहील दूर

UMANG अ‍ॅपद्वारे घरबसल्या अर्ज करा

जर तुम्हाला नवीन राशन कार्ड बनवायचं असेल, तर आता त्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलमध्ये UMANG हे अ‍ॅप डाउनलोड करायचे आहे. अँड्रॉइड वापरकर्ते हे अ‍ॅप Google Play Store वरून आणि iPhone वापरकर्ते Apple Store वरून डाउनलोड करू शकतात.

अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करा आणि दिलेल्या सूचनांनुसार राशन कार्डसाठी अर्ज भरा. या अ‍ॅपमुळे गरजू नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ डिजिटल माध्यमातून मिळतो. याचे सर्वात मोठे फायदे म्हणजे आता लोकांना कार्यालयीन चकरा माराव्या लागणार नाहीत. मोबाईलवर काही क्लिक करून आपण घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता.

सरकारच्या या उपक्रमामुळे पारदर्शकता वाढेल, वेळेची बचत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुविधा जलद गतीने पोहोचेल. आगामी काळात ही व्यवस्था देशभर लागू होण्याची अपेक्षा आहे.

UMANG App
Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com