Liver Health: लिव्हरमधील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर निघतील; फक्त ‘ही’ ३ फळं रोज खा, फॅटी लिव्हरची समस्या राहील दूर

Fatty Liver: दररोज आहारात ही ३ फळं घेतल्यास लिव्हरमधील टॉक्सिन्स बाहेर पडतात, फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो आणि लिव्हर अधिक निरोगी व सक्रिय राहते.
Fatty Liver
Liver Healthfreepik
Published On
Summary

आहारात आंबट फळं, सफरचंद आणि बेरीजचा समावेश लिव्हर डिटॉक्ससाठी उपयुक्त.

अँटिऑक्सिडंट्स लिव्हरमधील सूज आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी करतात.

नियमित व्यायाम आणि पुरेसं पाणी लिव्हरची कार्यक्षमता वाढवतात.

लिव्हर हे आपल्या शरीरात महत्वाचे काम करत असते. जो शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर काढण्याचे, पचन सुधारण्याचे आणि ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतो. लिव्हरला बॉडीचं पॉवरहाऊस म्हणतात. कारण तो शरीरातील जवळजवळ प्रत्येक क्रियेत सक्रिय भूमिका बजावतो. मात्र चुकीचा आहार, जास्त तेलकट पदार्थ, दारूचे सेवन आणि असंतुलित जीवनशैलीमुळे लिव्हरवर ताण येतो आणि त्यातून फॅटी लिव्हरसारखे आजार होतात.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार आणि हेल्दी लाइफस्टाइल. यासोबतच काही फळं रोजच्या आहारात सेवन केल्याने लिव्हरमधील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते आणि फॅटी लिव्हरपासून बचाव करण्यास मदत होते. ही फळं अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने भरपूर असतात जी लिव्हरला स्वच्छ आणि सक्रिय ठेवतात.

आंबट फळांचे सेवन करा

लिंबू, संत्री, मोसंबी, कीवी यांसारखी आंबट फळे लिव्हरसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. ही फळं व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि लिव्हरला टॉक्सिन्सपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. आंबट फळांमध्ये असलेले नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स लिव्हरमधील सूज कमी करतात आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी करतात.

Fatty Liver
Onion For Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी कांदा ठरेल बेस्ट, रक्तातली साखर होईल झटक्यात कमी, तज्ज्ञांनी दिली माहिती

सफरचंदाचे फायदे

सफरचंदात पेक्टिन नावाचं सॉल्युबल फायबर असतं. जे पचनसंस्थेतील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतं. यामुळे लिव्हरवरचा ताण कमी होतो आणि तो तास्त वेगाने काम करतो. नियमित सफरचंद खाल्ल्याने लिव्हरमध्ये फॅट साचण्याचा धोका कमी होतो आणि लिव्हर हेल्दी राहतो.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी देतात लिव्हरला संरक्षण

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रॅस्पबेरी, ब्लॅकबेरी यांसारख्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी अँटिऑक्सिडंट्स असतात. या फळांमध्ये असलेले अँथोसायनिन्स नावाचे घटक लिव्हरच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूजेमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. नियमितपणे या बेरीजचा आहारात समावेश केल्यास लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि ते निरोगी राहते.

Fatty Liver
Blocked Arteries Symptoms: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष केल्याने वाढेल हार्ट अटॅकचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com