

लग्नाची धामधूम संपल्यावर प्रत्येक जोडपं आपल्या आयुष्यातील सर्वात खास प्रवासाची म्हणजेच हनिमून ट्रिपची आतुरतेने वाट पाहत असतं. नव्या नात्याची गोड सुरुवात करण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी रोमँटिक वातावरण, निसर्गाचे सौंदर्य आणि शांतता यामुळे हनिमूनसाठी बेस्ट ठरतात. चला तर मग जाणून घेऊ या भारतातील टॉप १० हनिमून डेस्टिनेशनबद्दलची नावे आणि खासियत.
गोवा
सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे गोवाचं. गोवा हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील शांत वारे, सूर्यास्ताची सोबत आणि स्वादिष्ट सीफूड हे नवविवाहित जोडप्यांसाठी खास आकर्षण आहे.
मनाली
मनाली हे आणखी एक लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण बर्फाच्छादित पर्वत, थंडगार वारे आणि शांत वातावरणामुळे जोडप्यांच्या पसंतीचं ठरते. तुम्ही इथे पार्टनरसोबत स्कीईंग, पाराग्लायडिंग आणि हॉट स्प्रिंग्सचा अनुभव घेऊ शकता.
गुलमर्ग
गुलमर्ग हा रोमँसचा खरा दरबारच म्हणावा लागेल. हिमालयाच्या पीर पंजाल रांगेत वसलेलं हे ठिकाण बर्फाळ मैदानं, स्कीईंग स्पॉट्स आणि निसर्गसौंदर्यामुळे ओळखलं जातं. हिवाळी क्रीडांचा केंद्रबिंदू म्हणून गुलमर्गची ओळख आहे.
अलप्पी (Alleppey)
अलप्पी (Alleppey) म्हणजेच केरळचं Venice of the East. इथल्या बॅकवॉटर राइड्स, हाउसबोटमध्ये केलेली राहण्याची सोय आणि नारळाच्या झाडांची शृंखला नवविवाहितांसाठी अविस्मरणीय ठरते. डिसेंबरमध्ये होणारा मुल्लक्कल चिराप उत्सवही मोठं आकर्षण आहे.
जैसलमेर
जैसलमेर हे राजस्थानचं सुवर्ण शहर नव्या नात्याला उबदारता देणारं ठिकाण आहे. वाळवंटातील कॅम्पिंग, उंट सफारी आणि लोकसंगीताचा अनुभव घेताना प्रत्येक क्षण रोमँटिक बनतो.
मुन्नार
मुन्नार हे केरळमधील हिरवागार हिल स्टेशन. चहाच्या मळ्यांचा सुगंध आणि डोंगरांवरील धुक्याने झाकलेली सकाळ ही जोडप्यांसाठी स्वप्नवत अनुभूती ठरते.
कूर्ग
कूर्ग (Coorg) हे भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जातं. कॉफीच्या मळ्यांमध्ये फिरणं, धबधब्यांचा आवाज आणि शांत वातावरण हे नवविवाहितांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक पार्श्वभूमी तयार करतात.
गंगटोक
गंगटोक हे ‘सेकंड स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. रंगीबेरंगी फुलं, बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर मठ या सगळ्यामुळे हे ठिकाण हनिमूनसाठी आदर्श आहे.
पुदुच्चेरी
पुदुच्चेरी (Puducherry) हे फ्रेंच संस्कृतीचा गंध असलेलं ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे, रंगीत गल्ली आणि शांत वातावरण हे प्रत्येक क्षण खास बनवतात.
दार्जिलिंग
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक. येथे उंच पर्वतरांगांमध्ये बसून गरम चहाचा कप हातात घेऊन सूर्यउदय पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. त्यामुळे तुमचा हनिमून अविस्मरणीय बनवण्यासाठी भारतातील ही १० ठिकाणं नक्कीच सर्वोत्तम ठरतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.