Ration Card
Ration CardSaam Tv

Ration Card: केंद्र सरकारने 'रेशन'बाबत घेतला मोठा निर्णय, राज्यांना थेट पत्र पाठवलं

Ration Card New Rule: रेशनबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारने राज्यांना आगाऊ धान्य घेण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्यांना पत्र पाठवले आहेत.
Published on
Summary

रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारने राज्यांना दिले निर्देश

जून २०२६ पर्यंतचा गॅस आणि तांदूळाचा साठा घेण्याच्या सूचना

केंद्र सरकारने रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे. आता जून २०२६ पर्यंत ३ महिन्याचे धान्य केंद्राकडून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Ration Card
Ration Shop : रेशन दुकानदाराचा अजब कारनामा; धान्याच्या मोबदल्यात लाभार्थ्यांना पैसे वाटप, अकोला जिल्ह्यातील प्रकार उघड

आता केंद्र सरकारने सांगितले आहे की, गहू आणि तांदूळ केंद्रीय साठ्यातून घेऊन लाभार्थ्यांमध्ये वितरित करायचे आहे. सरकारी धान्य साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य आहे, त्यामुळे निर्देश दिले आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये नवीन गहू खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे आगाऊ खरेदी करण्याल सांगितले आहे.

राज्यांना पत्राद्वारे दिल्या सूचना (Ration Card New Rule)

केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या अन्न सचिवांना पत्र पाठवले आहे. पत्रात यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. साठवणूक आणि वाहतूकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जून २०२६ पर्यंतचे धान्य आगाऊ पद्धतीने घेऊन लाभार्थ्यांना द्यायचे आहे, असं पत्रात सांगितले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया National Food Security Act अंतर्गत येते.

Ration Card
Ration Card Online: घरबसल्या बनवा रेशन कार्ड! मोबाईल अ‍ॅपवरच होईल पूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत एफसीआयकडे ३७.२ दशलक्ष टन तांदूळ आणि २३.५ दशलक्ष गहू आहे. हा साठा १८५ टक्के जास्त असल्याचे सांगितले जात आहे.त्यात नवीन धान्यदेखील येणार आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा ८० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होत आहे.हे धान्य वितरित केल्यामुळे गोदामांमध्ये जागा उपलब्ध होईल. त्यामुळे नवीन धान्य जमा होण्यास जागा होईल.

Ration Card
Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com