Student scholarship scheme : अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३००० रुपये, काय आहे ही सरकारी योजना, कोण असेल पात्र, लाभ कसा मिळवायचा?

Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship: महाराष्ट्र शासनाची राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना १० वीमध्ये ७५% गुण मिळवलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी आहे. ११ वी आणि १२ वीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship
Maharashtra scholarshipgoogle
Published On

प्रत्येक आई-वडीलांना वाटत असतं की, आपलं मुल हे शिकून मोठ्या पदावर काम करावं. चांगलं नाव मिळेल अशी पदवी त्यांनी घ्यावी. त्यासाठी सुरुवातीला शिशूवर्ग मग पहिली ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी घेणं अनिवार्य असतं. पण पुढे काय? बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती ही चांगली नसते. त्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणं कठीण होतं मग ते फक्त शालेय शिक्षणाच्या जोरावर त्यांचे पुढील आयुष्य काढत असतात.

महाराष्ट्र शासनाने अशाच गरजू मुलांमुलींसाठी काही शिष्यवृत्त्या काढल्या आहेत. याचा वापर करुन त्यांना शाळेनंतरचे म्हणजे ११ वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण करता येईल. पुढील बातमीत आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship
EPFO Pension Rule: २ बायका असतील तर पेन्शन कोणाला मिळते? जाणून घ्या EPFO चा नियम

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत. या शिष्यवृत्तीची सुरुवात राज्य शासनाने ही ११ जून २००६ पासून करण्यात आली आहे. याचा उद्देश हा सगळ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्पर्धांमध्ये टिकून राहावेत हा आहे. कारण शिक्षणाशिवाय कोणत्याच क्षेत्रात तुम्हाला काम करता येत नाही.

विद्यार्थ्यांची पात्रता

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थींनी इयत्ता १० वीमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनूसूचित जातीच्या मुला-मुलीसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ हा ११ वी १२ वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आहे.

शिष्यवृत्तीमध्ये कधी आणि किती रक्कम मिळेल?

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना एकूण ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. पण ही रक्कम एकत्र मिळणार नाही. इयत्ता ११वीमध्ये तुम्हाला महिन्याला ३०० रुपये मिळतील. ही रक्कम १० महिने मिळेल. म्हणजेच वर्षाला ३००० रुपये मिळतील. तसेच १२वीत सुद्धा हीच पद्धत असेल.

Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship
High Cholesterol: वजन वाढल्यामुळे वाढू शकतो कोलेस्टेरॉल अन् हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com