Property Inheritance Rules: मृत्यूपत्र न करता वडिलांचं निधन झाल्यास संपत्तीवर पहिला हक्क कोणाचा? मुलाचा की मुलीचा

Son-Daughter Property Rights : वडिलांच्या नावावरील संपत्ती, मालमत्तेवरून भाऊ-बहिणींमध्ये अनेकदा वाद होत असतात. वडिलांच्या मालमत्तेवर फक्त मुलाचाच हक्क असतो, का? हे जाणून घेऊ.
Property Inheritance Rules: Son Or Daughter Who Has The Right To Father’s Property?
Property Inheritance Rules: Son Or Daughter Who Has The Right To Father’s Property?saam tv
Published On: 
Summary
  • मृत्यूपत्र नसताना मालमत्ता फक्त मुलाला मिळते असे नाही; हिंदू उत्तराधिकार कायद्यात Class I वारसांना महत्त्व आहे.

  • मृत्यूपत्र नसताना मालमत्ता फक्त मुलाला मिळते असे नाही; हिंदू उत्तराधिकार कायद्यात Class I वारसांना महत्त्व आहे.

  • वडील जिवंत असताना स्व-अर्जित मालमत्तेवर मुलगा किंवा मुलीचा आपोआप हिस्सा निर्माण होत नाही.

Property Rights : मुलगा आणि मुलीला त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा करण्याचा हक्क कधी मिळतो? याचे उत्तर मालमत्तेचा प्रकार, वडील जिवंत आहेत की नाही आणि त्यांनी केलेल्या मृत्युपत्रावरून ठरत असतं. भारतातील हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, काही प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलीला समान हक्क मिळू शकतात. परंतु वडील हयातीत असताना सर्व मालमत्ता आपोआप मुला-मुलीकडे हस्तांतरित होते असं नाही.

वडिलांच्या मालकीचे घर, जमीन, फ्लॅट असताना अनेकदा प्रश्न उद्भवतो की, मुलगा आणि मुलीला त्यात आपोआप वाटा मिळतो का? वडिलोपार्जित घरे, वारसा हक्काने मिळालेली जमीन आणि संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबाबत अनेकदा वाद निर्माण होत असतात. तुमचं लग्न होणार आहे किंवा झालं आहे? तुम्ही विभक्त झाला आहात की तुमचे पुन्हा लग्न होणार आहे? तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे, किंवा तुम्ही त्यांच्यासोबत राहत असताना मालमत्तेवर हक्क सांगायचं आहे?

Property Inheritance Rules: Son Or Daughter Who Has The Right To Father’s Property?
Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

ही प्रश्ने ठरवतात की मुलगा किंवा मुलीला वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळतो की नाही. काही विशिष्ट परिस्थितीत, मुलीला वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क असतात. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 6 नुसार, मुलीला मुलाप्रमाणेच जन्माने coparcener मानले जाते असते. केवळ विवाहित आहे किंवा मुलगी आहे म्हणून लेकीला मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही, पण मुलीला मिळणारा नेमका वाटा कुटुंबातील सदस्य, मालमत्तेचा प्रकार आणि पूर्वी झालेल्या कोणत्याही कायदेशीर वाटणी किंवा हस्तांतरणावर अवलंबून असतो.

Property Inheritance Rules: Son Or Daughter Who Has The Right To Father’s Property?
Pith Girni Anudan: महिला आणि बेरोजगारांना सरकारचं गिफ्ट; पीठ गिरणीसाठी देणार 90 टक्क्यांपर्यंत अनुदान, कुठे-कसा कराल अर्ज?

मृत्युपत्राशिवाय वडिलांचा मृत्यू झाल्यास काय?

एखाद्या हिंदू वडिलांचा मृत्युपत्राशिवाय मृत्यू झाल्यास हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मालमत्तेची वाटणी केली जाते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही प्रथम श्रेणीचे वारस असतात. तसेच पत्नी आणि आई यांचाही क्लास-1 मध्ये समावेश होत असतो. उदाहरणार्थ वडिलांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हयात असतील आणि इतर कोणीही प्रथम श्रेणीचे वारस नसतील.

तर साधारणतः तिघांचा मालमत्तेत समान हक्क असतो. तसेच वडिलांची आईसुद्धा हयात असेल, तर तीसुद्धा प्रथम श्रेणीची वारस असेल आणि वाट्यात बदल होईल. त्यामुळे, केवळ मुलालाच मालमत्तेचा वारसा मिळेल किंवा लग्नानंतर मुलीचे हक्क नसतात हे म्हणणं चुकीचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com