Bharat Jadhav
सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना कर्ज सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.
शेतीविषयक कर्जासाठी अर्ज करताना जमिनीबाबतची माहिती देणे आवश्यक असते. अशावेळी प्रश्न असा पडतो की, जर एखाद्याला एका बिघा जमिनीवर कर्ज घ्यायचे असेल, तर त्याला किती रक्कम मिळू शकते?
एक बिघा जमीन म्हणजे २० कट्ठा किंवा २७,२२५ चौरस फूट जमीन हे प्रमाण राज्यानुसार बदलते.
एका बिघा शेतजमिनीसाठी मिळणारी कर्जाची रक्कम ही जमिनीचे ठिकाण, जमिनीचा कस (सुपीकता), त्यावर घेतली जाणारी पिके, संबंधित बँकेची धोरणे आणि सरकारने निश्चित केलेले दर यांवर अवलंबून असते.
साधारणपणे, अशा प्रकारची कर्जे कृषी कर्जांच्या श्रेणीत येतात. केंद्र सरकार 'किसान क्रेडिट कार्ड' योजनेद्वारे या उद्देशासाठी एक विशेष सुविधाही उपलब्ध करून देते. देशात अशा अनेक बँका आहेत ज्या कृषी कर्ज सुविधा देतात. या बँका जमिनीच्या एकूण मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम निश्चित करतात.
तुमच्या जमिनीच्या एकूण मूल्याच्या ५० ते ७५ टक्के इतके कर्ज तुम्ही मिळवू शकता. जर तुमच्या एका बिघा जमिनीचे मूल्य १० लाख रुपये असेल, तर नियमांनुसार तुम्ही ५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज घेऊ शकता.
जमिनीची कागदपत्रे (सातबारा, किंवा नोंदणीची कागदपत्रे)
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी)
उत्पन्नाचा पुरावा (बँक स्टेटमेंट आणि इतर आवश्यक कागदपत्रे)
पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर कागदपत्रे.