Pith Girni Anudan: महिला आणि बेरोजगारांना सरकारचं गिफ्ट; पीठ गिरणीसाठी देणार 90 टक्क्यांपर्यंत अनुदान, कुठे कसा कराल अर्ज?

Flour Mill Subsidy Scheme: महिला व पात्र लाभार्थ्यांना पीठ गिरणी व्यवसायासाठी जिल्हास्तरीय योजनांतर्गत अनुदान किंवा आर्थिक सहाय्य मिळू शकते. पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या.
Flour Mill Subsidy Scheme: Up To 90% Assistance For Eligible Beneficiaries
Flour Mill Subsidy Scheme: Up To 90% Assistance For Eligible Beneficiariessaam tv
Published On: 
Summary
  • काही जिल्हास्तरीय योजनांमध्ये आर्थिक अनुदान दिले जाते.

  • जिल्हा परिषदांकडून विविध स्वयंरोजगार योजना राबवल्या जातात.

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकृत माहितीनुसार संबंधित पिठाची गिरणी योजनेत निश्चित दराच्या 90% अनुदानाची तरतूद आहे.

महिला सबलीकरण करण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार उत्पन्न करून देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. यातील एक योजनेतून महिला आणि बेरोजगारांना आपला रोजगार मिळवून देण्यासाठी पीठ गिरणीसाठी अनुदान योजना आणलीय. बहुतांश युवकांना आपल्या गावातचं रोजगार हवा असतो. या पार्श्वभूमीवर ही योजना राबवली जातेय.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवणे आणि गावांतर्गत रोजगार निर्माण करणे आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून (स्वनिधी) महिला आणि बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी पीठ गिरणी खरेदीवर ९० टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं.

Flour Mill Subsidy Scheme: Up To 90% Assistance For Eligible Beneficiaries
Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

काय आहे पात्रता आणि अटी

अर्जदार महिला ग्रामीण भागातील रहिवासी असणे अनिवार्य.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा कमी असावे (काही जिल्ह्यांत ही मर्यादा ५० हजार ते १ लाखांपर्यंत असते).

अर्जदाराच्या घरात आधीपासून सरकारी नोकरीत कोणीही नसावे.

अर्जदाराने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही यंत्रसामग्री योजनेचा लाभ घेतलेला नसावा. दारिद्र्यरेषेखालील महिला, विधवा, परितक्त्या किंवा दिव्यांग महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते.

Flour Mill Subsidy Scheme: Up To 90% Assistance For Eligible Beneficiaries
राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड आणि बँक पासबुक प्रत

रहिवासी दाखला (ग्रामसेवक/सरपंचांचा दाखला)

उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार किंवा तलाठी प्रमाणित)

जातीचा दाखला (मागासवर्गीय प्रवर्गासाठी)

रेशन कार्ड (दारिद्र्यरेषेचा उल्लेख असलेले)

घरपट्टी पावती किंवा ८-अ उतारा

लाईट बिल (गिरणी जोडणीसाठी आवश्यक)

अर्ज कसा आणि कुठे करावा?

या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो. एक ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन.

ऑफलाईन पद्धत : तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात (महिला व बालकल्याण विभाग) जावे लागेल. तिथे सेस फंडाच्या योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज मिळत असतो.

ऑनलाईन पद्धत :

अनेक जिल्हा परिषदांनी स्वतःचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येतो. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तो गट विकास अधिकारी किंवा ग्रामसेवकांकडे जमा करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com