
प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी सेविंग करत असतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर भविष्यात दर महिन्याला काही ठरावीक रक्कम नागरिकांना दिली जाते. पीपीएफ योजनेत चांगले व्याजदर मिळते. ही एक सुरक्षित योजना आहे.
पीपीएफ योजनेत ७ टक्के रिटर्न मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्ही रोज १०० रुपये जमा करुन १० लाख रुपये मिळवू शकतात.
पीपीएफ योजनेत चांगला परतावा मिळतो. त्याचसोबत चक्रव्याढ व्याज मिळते. त्यामुळे या योजनेत डबल व्याज मिळते. या योजनेत तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करा. या योजनेत चक्रव्याढ व्याजासोबत इतर फायदेदेखील मिळतात.
पीपीएफ योजनेत तुम्ही फक्त ५०० रुपये गुंतवून इन्व्हेस्टमेंट सुरु करु शकतात. या योजनेत तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याज मिळते.
पीपीएफ योजनेत १०० रुपये गुंतवून १० लाख मिळवू शकतात.म्हणजेच तुम्ही महिन्याला ३००० रुपये गुंतवणार आहात. वर्षाला ३६,००० रुपयांची गुंतवणूक करणार आहात. म्हणजेच मॅच्युरिटी पीरियडपर्यंत म्हणजेच १५ वर्षांनंतर तुम्हाला ९,७६,३७० रुपये मिळणार आहे. यातील इन्व्हेस्टमेंट ५.४० लाखांची असणार आहे. तर व्याजदर ४,३६,३७० रुपये मिळणार आहे.
पीपीएफ योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही गुंतवणूक करु शकतात. जर ५ वर्षांसाठी तुम्ही अजून गुंतवणक केली तर तुम्हाला डबल रिटर्न मिळणार आहे. २० वर्षांसाठी तुम्ही ७,२०,००० रुपये गुंतवणार त्यावर व्याज म्हणून ८,७७,९८९ रुपये मिळणार आहे. रोज १०० रुपयांची बचत करुन २० वर्षात तुम्ही १५,९७,९८९ रुपये मिळवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.