SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! एकदा गुंतवणूक करा, मिळणार ७.६० टक्के परतावा

SBI Amrut Kalash Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी खास अमृत कलश योजना राबवली आहे. ही योजना फक्त ४०० दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२५ आहे.
SBI Scheme
SBI SchemeSaam Tv
Published On

अनेकजण आपल्या कुटुंबाच्या उत्तम भविष्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. एफडीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाँग टर्म फायदा मिळतो. त्यामुळे अनेकजण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतात. एफडीतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत परतावा मिळतो. देशातील अनेक बँका एफडीवर चांगले व्याजदरदेखील देतात. जर तुम्हीही एफडीत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करा.

SBI Scheme
MSSC Scheme Benefits: बायकोच्या नावानं २ लाख रुपये गुंतवा; मिळणार ३२००० रिटर्न, काय आहे योजना!

स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेत कमीत कमी दिवसात चांगला परतावा मिळतो. ही योजना ४०० दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

या योजनेत तुम्हाला फक्त ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांसाठी ७.१० टक्के व्याजदर दिले जाणार आहे. ज्ये्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळते. ही योजना सुरक्षित आहे. या योजनेत तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करा.

अमृत कलश योजनेत भारतीय आणि एनआरआय दोघेही अर्ज करु शकतात. या योजनेत डिपॉझिट आणि रिन्यू अशा योजनांचा समावेश आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा कमी गुंतवणूकीवर टर्म डिपॉझिट लागू आहे.

SBI Scheme
Women Savings Scheme India: 'ही' सरकारी योजना महिलांसाठी ठरतेय खास, गुंतवणुकीवर व्याज मिळते जास्त, २ वर्षांत जबरदस्त कमाई

या योजनेत महिन्याला, तिमाही आणि सहा महिन्यांच्या आधारे व्याजदर दिले जाते. टर्म डिपॉझिटमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी व्याजदर दिले जातात.

या योजनेत टीडीएस कापला जातो. त्यामुळे तुम्हाला टीडीएसमधून सूट हवी असेल तर फॉर्म 15G/15H भरावा लागेल. तसंच या योजनेत लोन सुविधादेखील मिळते. या योजनेत तुम्ही स्टेट बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.

SBI Scheme
Government Scheme : मुलगी लखपती होणार! जन्मावेळी ५०,००० रुपये मिळणार; १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com