धुळे : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घेतला आहे. दरम्यान आता बहुतांश महिला आता योजनेचा लाभ घेण्यास माघार घेत आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात आतापर्यंत २० लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करत योजनेचा लाभ नाकारला आहे. अंगणवाडी स्तरावरुन सदर अर्ज महिला व बालविकास कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
राज्य शासनाने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला. योजनेची घोषणा केल्यानंतर यात काही अटीशर्ती लावण्यात आल्या होत्या. मात्र अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना सरसकट लाभ देत खात्यात १५०० रुपये टाकण्यात येत आहेत. तर आता मार्च महिन्यापासून योजनेची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्यात आली आहे. मात्र यासाठी आता निकष लावण्यात आले असून यासाठी आता अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे.
१४ हजार ७३३ बहिणींचे अर्ज रद्द
धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एकूण ५ लाख ४० हजार इतकी आहे. या महिलांच्या खात्यात नियमितपणे दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहे. धुळे जिल्ह्यातील १४ हजार ७३३ लाडक्या बहिणींचे अर्ज विविध कारणांनी रद्द झाले आहेत. यात ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणे, अर्जात त्रुटी तसेच अन्य कारणांमुळे सदर लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
पडताळणीनंतर आकडा वाढणार
लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची आता पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये किती महिला एकापेक्षा अधिक योजनाचा लाभ घेत होत्या किंवा त्यांच्याकडे चारचाकी वाहने होती. याची पडताळणी केली जाणार आहे. मात्र धुळे जिल्ह्यात याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान पडताळणीनंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.