Saam Impact News : आधार कार्ड, कागदपत्र फेकणारे ४ पोस्ट कर्मचारी निलंबित; धडगाव तालुक्यात घडला होता धक्कादायक प्रकार

Nandurbar News : पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याचा प्रकार समोर आला होता. कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे देखील यात समोर आले होते
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : घरपोच सेवा देण्याचे पोस्ट कार्यालयाकडून होत असताना धडगाव तालुक्यातील टपाल कार्यालयाकडून धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोस्टामार्फत टाकण्यात आलेले कागदपत्रांचे वाटप न करता ते फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर याची दखल घेण्यात आली असून गैरकारभार करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या मांडवी पोस्ट ऑफिसमधील वावी, कामोद, काकडदा, घाटली, मखतारझिरा, वलवाल, मांडवी बु., मांडवी खु. तसेच जुगणी पोस्ट ऑफिसमधील निगदी, जुगणी, गोरांबा, मोडलगाव, तेलखेडी. वेलखेडी पोस्ट या गावातील सर्व लोकांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँकेचे चेक बुक, कोर्ट नोटीस, पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्रे वडफळ्याकडे बँक ऑफ इंडिया बँकेचा मागे कचऱ्यात फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Nandurbar News
Nandurbar Water Crisis : तोरणमाळ परिसरात फेब्रुवारीतच पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी ५ किलोमीटर जीवघेणा प्रवास

पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याचा प्रकार समोर आला होता. कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे देखील यात समोर आले होते. यामध्ये आधार कार्ड व काही महत्वाची कागदपत्र होती. दरम्यान साम टीव्हीच्या बातमीनंतर उघड्यावर फेकले ७२४ आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे हे घरोघरी जाऊन वाटप करण्याचं काम सुरू आहे.

Nandurbar News
Onion Price Increase : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कांद्याच्या दरात तेजी, मागणी वाढल्याने भाववाढ

साम टीव्हीच्या बातमीची दखल  

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोस्ट ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे कागदपत्रांसोबतच आधार कार्ड उघड्यावर फेकून देण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर संबंधित पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत उघड्यावर आधार कार्ड फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात धडगाव तालुक्यातील चार पोस्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com