Nandurbar Water Crisis : तोरणमाळ परिसरात फेब्रुवारीतच पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी ५ किलोमीटर जीवघेणा प्रवास

Nandurbar News : राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत
Nandurbar Water Crisis
Nandurbar Water CrisisSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची तीव्र झळा पाहायला मिळत आहेत. चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगरवाटातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहेत. साधारण २०० फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे दुर्दैवी विचित्र सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळत आहे.

राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत. केलापाणी या गावात जायला रस्ता नसल्यामुळे येथील स्थानिक आदिवासी बांधवांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ५५० वस्ती असलेल्या या गावात आजही रस्ता पोहोचलेला नाही. मूलभूत सुविधांसाठी इथल्या आदिवासी बांधवांना १५ किलोमीटरच्या पायी जीवघेणा प्रवास दररोज करावा लागत आहे.

Nandurbar Water Crisis
Navi Mumbai : भल्या पहाटे पोलिसांची अकरा ठिकाणी धाड; नवी मुंबईतील कारवाईत पोलिसही झाले अवाक, तीन आफ्रिकन नागरिकांना अटक

पाण्यासाठी २०० फूट खोल दरीत उतरलाय महिला

केलापाणी गावाला रस्ता नसल्यामुळे आरोग्य सुविधा, वीज, पाणी या मूलभूत सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत. त्या आदिवासी महिलांना चक्क ४ ते ५ किलोमीटर पर्यंतचा डोंगराळ भागातून जीवघेणा प्रवास करत २०० खोल दरीत उतरून पिण्याचे पाणी आणावं लागत आहेत. दोनशे फूट खोल दरीत असलेल्या एका नाल्यातून या महिला पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Nandurbar Water Crisis
Sangli Police : शाळकरी मुलाने खुलेआम व्यसन; इ सिगारेट विकणाऱ्या दुकान चालकाला अटक

राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष 
जलजीवन मिशन आणि रस्त्यांच्या विकासाचे गप्पा मारणारे राजकीय पुढारी यांनी केलापाणी गावात जाऊन तिथल्या आदिवासी बांधवांच्या समस्या एकदा जाणून घ्याव्यात, मगच विकासाच्या गप्पा माराव्यात; असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com