Form 16 Article: फॉर्म 16 म्हणजे काय? तो कसा मिळवायचा, नसेल तर ITR रिटर्न कसं फाइल करायचं?

What Is Form 16: फॉर्म 16 हा पगार घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे कारण तो आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करतो. हा फॉर्म 16 म्हणजे काय तो कसा मिळवायचा? हे आपण जाणून घेणार आहोत...
Form 16 Article
What Is Form 16saam Tv
Published On

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करत असाल तर तुमच्यासाठी फॉर्म -१६ खूपच महत्वाचा आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेत फॉर्म-१६ महत्त्वाची भूमिका बजावतो. फॉर्म -१६ हे कर दस्तऐवज आहे. एखाद्या कंपनीच्या वतीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म -१६ जारी केला जातो. फॉर्म-१६ हे पगाराच्या पेमेंटवर कर कपात केलेल्या स्त्रोतावर (TDS) प्रमाणपत्र म्हणून काम करते. फॉर्म- १६ मध्ये कमावलेले उत्पन्न, टीडीएस कपात आणि आयकर कायद्यांतर्गत परवानगी असलेल्या इतर वजावटीचा तपशील आहे.

फॉर्म -१६ म्हणजे काय -

फॉर्म 16 हा पगार घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे कारण तो आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करतो. फॉर्म-१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर कापलेल्या कराची सर्व माहिती असते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एचआरए किंवा सर्व प्रकारची गुंतवणूक करून कर वाचवला असेल तर त्याबाबतची सर्व माहिती फॉर्म-१६ मध्ये दिली आहे. फॉर्म- १६ म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारावर कर मोजण्याचे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्रही कंपन्यांनी सरकारला सादर केले आहे.

Form 16 Article
ITR Filling: १ वर्ष आयटीआर न भरल्यास काय होणार? काय आहेत नियम; जाणून घ्या

आयटीआर भरण्यासाठी आवश्यक -

फॉर्म -१६ मध्ये कर्मचार्‍याला दिलेला पगार, कर्मचार्‍याने दाखवलेला डिडक्शन म्हणजेच वजावट आणि कंपनीने कापलेला टीडीएस म्हणजेच उत्पन्नावरील कर कपातीची सर्व माहिती असते. जर तुम्हाला फॉर्म-१६ मिळाला तर तुम्ही इककम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास उशिर लावू नये. नोकरदार वर्गाला आयटीआर भरण्यासाठी फॉर्म-१६ ची आवश्यकता असते. फॉर्म -१६ तुम्हाला नोकरी करत असलेल्या कंपनीकडून दिला जातो.

Form 16 Article
ITR Filling: CA शिवाय आयटीआर फाइल करता येतो का? जाणून घ्या सोपी पद्धत; वेळ अन् पैसा दोन्ही वाचेल

असा डाऊनलोड करा फॉर्म- १६ -

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म- १६ दिला जातो. यावर कर्मचाऱ्याचे उत्पन्न आणि कराशी संबंधित माहिती दिलेली असते. तुम्ही काम करत असलेल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना हा फॉर्म देणे गरजेचे असते. पण काही कंपन्या कर्मचाऱ्यांना फॉर्म- १६ देत नाहीत. त्यामुळ आयटीआर भरताना अडचणी येतात. जर तुमच्या कंपनीने तुम्हाला फॉर्म-१६ दिला नाही तर तुम्ही TRACES नावाच्या वेबसाइटवरून फॉर्म- १६ डाउनलोड करू शकता.

Form 16 Article
ITR चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का?

फॉर्म-१६ शिवाय असं फाइल करा आयटीआर रिटर्न -

आयटीआर रिटर्न भरताना तुम्ही फॉर्म-१६ शिवाय रिटर्न फाइल करू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे हवी आहेत. ही कागदपत्रे तयार ठेवा, त्यानंतर तुम्ही सहज ITR दाखल करू शकता. जर तुम्हाला फॉर्म-१६ शिवाय आयटीआर फाइल करायचा असेल तर तुम्हाला महिन्याच्या पगाराची स्लिप, टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट आवश्यक असेल. तुम्हाला TRACES वेबसाइटवर टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट म्हणजेच फॉर्म 26AS सहज मिळेल. तुम्हाला भाडे करार आणि इतर काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. तुम्हाला बँकेकडून मिळालेल्या व्याजाचे उत्पन्न प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

Form 16 Article
सरकारनं वाढवली ITR फाईल करण्याची मुदत; या लोकांना होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com