ITR Filling: १ वर्ष आयटीआर न भरल्यास काय होणार? काय आहेत नियम; जाणून घ्या

Can I skip ITR for a Year : दरवर्षी प्रत्येकाला आयटीआर फाइल करायचा असतो. जर एखाद्या वर्षी आयटीआर फाइल केला नाही तर काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

देशाचे अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केले जाणार आहे. या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. जानेवारी महिना सुरु होताच सर्वजण इन्कम टॅक्स फाइल करण्याच्या मागे असतात. सामान्यत जुलै महिन्यात आयटीआर भरण्याची शेवटची तारीख असते. परंतु अनेकजण आयटीआर भरत नाही. जर तुम्ही एखाद्या वर्षी आयटीआर भरला नाही तर काय होणार? जाणून घ्या.

ITR Filling
Belated ITR: आयटीआर भरायला उशिर केला अन् सरकारची तिजोरी भरली; ६२७ कोटी दंड वसुली

आयटीआर फाइल न केल्यास काय होणार? (Can I skip ITR for a year?)

प्रत्येकाला आयटीआर फाइल करणे अनिवार्य आहे. तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा इन्कम टॅक्स कापला जातो. जर तुम्ही एखाद्या वर्षी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याचसोबत शिक्षादेखील होऊ शकते.

जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला बिलेटेड आयटीआर फाइल करता येतो. बिलेटेड आयटीआर भरु शकतात. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. बिलेटेड आयटीआर फाइल करण्यासाठी तुम्हालादंड भरावा लागू शकतो. तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर १००० रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ५००० रुपये दंड भरावा लागू शकतो.

जर तुम्ही आयटीआर फाइल केला नाही तुमचे नाव डिफॉल्टर्समध्ये असेल तर तुम्हाला ७ वर्षांची जेल होऊ शकते. त्याचसोबत दंड भरावा लागू शकतो.

ITR Filling
ITR Refund: ITR भरुनही रिफंड मिळाला नाही?असू शकतात ही ८ कारणे कारणीभूत

तुम्ही ३ वर्षांचा आयटीआर भरु शकता का? (Can I file last 3 years income tax return?)

हो, तुम्ही ती वर्षांचा आयटीआर भरु शकतात. तुम्ही ITR-U फाइल करु शकतात. मागील दोन वर्षाचे आयटीआर भरले नसतील तर ते भरण्यासाठी हा फॉर्म भरा आणि सध्याच्या चालू वर्षासाठी नॉर्मल आयटीआर फाइल करा.

ITR Filling
ITR Filling: CA शिवाय आयटीआर फाइल करता येतो का? जाणून घ्या सोपी पद्धत; वेळ अन् पैसा दोन्ही वाचेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com