Pune News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल

Pune Public Hygiene: पुणे महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली. या कालावधीमध्ये ४५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Pune News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल
Pune Public HygienSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. १८ दिवसांत ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे.

पुणे महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली असून ४५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

१८ दिवसांत आकारलेला दंड -

- रस्त्यावर थुंकणे - १ लाख २६ हजार

- उघड्यावर लघु शंका करणे - ९१ हजार ७००

- कचरा जाळणे - ५५ हजार

- कचरा वर्गीकरण न करणे - १ लाख ५ हजार

- बंदी असलेला मांजा विक्री - २५ हजार ५००

- सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता- १८ लाख २१ हजार २००

- कचरा प्रकल्प बंद असणे- ४० हजार

- बांधकाम राडाराडा - ५ लाख ५८ हजार

- प्लास्टिक कारवाई- ७ लाख ५५ हजार

- बायोमेटिकल वेस्ट - १५ हजार

- इतर - ५ हजार

Pune News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल
Pune : एक लाखांचा दंड, अनधिकृत शाळांबाबत कठोर पाऊल, शिक्षण विभागाचा निर्णय

दुसरीकडे रात्रीतून पुणे शहर चकाचक होणार आहे. सकाळी शहर स्वच्छ असावे यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने याचे नियोजन महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे.

एकीकडे बेशिस्त नागरिक अन् दुसरीकडे सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनाला उशीर होत असल्याने शहरात कचरा दिसत आहे. पण सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगले वातावरण अनुभवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रात्रीतून शहर स्वच्छ करण्याचा मुद्दा पुढे आला.

Pune News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल
Pune News : सकाळ-संध्याकाळी वॉकसाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! २ घटनांमुळे पुण्यात खळबळ

महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध असणार आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करत आहे. कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यापुढे पुणे शहरामध्ये कुठेच कचरा दिसणार नाही.

Pune News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकताना, कचरा फेकताना थांबा, १८ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल
Pune Police : पुण्यात एमडी ड्रग्सनंतर अफिमची विक्री, राजस्थानच्या तरुणाकडून २१ लाखांचे अफिम जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com