Pune Police : पुण्यात एमडी ड्रग्सनंतर अफिमची विक्री, राजस्थानच्या तरुणाकडून २१ लाखांचे अफिम जप्त

Pune News : कोंढवा परिसरात उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर कोढया पुणे येथे एक इसम उभा होता. त्याचे हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेवुन तो संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले
Pune Police
Pune PoliceSaam tv
Published On

अक्षय बडवे 
पुणे
: पुणे शहरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी दाखल झाल्याचे अनेकदा आढळून आले आहे. एमडी ड्रग्सनंतर आता अफिम विक्रीसाठी आणण्यात आल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधून आलेल्या तरुणाकडे हे अफिम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे २१ लाख रुपयांचे अफिम जप्त करण्यात आले आहे. 

राजस्थान येथील नाथुराम जीवणराम जाट असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना पुणे शहरातील कोंढवा परिसरात असणाऱ्या उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर कोढया पुणे येथे एक इसम उभा होता. त्याचे हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेवुन तो संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले. 

Pune Police
Onion Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; सातत्याने घसरणार दर स्थिरावले

बॅगमध्ये आढळला एक किलो अफिम 

पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले. दरम्यान पोलिसांना त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे अधिक संशय आला. यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये तब्बल एक किलो इतके अफीम मिळून आले. या १ किलो ९० ग्रॅम अफिमची किंमत वीस लाख ८० हजार इतकी आहे. हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. 

Pune Police
Kalyan Police : डोंबिवलीत गांजा तस्करी करताना एकजण ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई

झटपट पैसे कमविण्यासाठी पत्करला मार्ग  
आरोपी हा फर्निचर बनवण्याच्या कामासाठी यापूर्वी पुणे शहरामध्ये आला होता. मात्र अल्पावधीत पैसे कमावण्यासाठी अफिम विक्री करण्यासाठी पुण्यात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान संशयित आरोपीच्या विरोधात कोढवा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com