Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

Poultry farming business loan: कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज मिळते. हे कर्ज कसे आणि कुठून मिळवायचे हे घ्या जाणून...
Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
Poultry farming business loanSaam Tv
Published On
  • कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज मिळते

  • देशातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी अनेक अनुदान योजना

  • बँकांकडून देखील या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते

  • या कर्जासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक

भारत एक कृषीप्रधान देश आहे. येथे शेती आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांना चालना दिली जाते. आजकाल शेतकऱ्यांमध्ये कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे. कुक्कुटपालन किंवा मांस आणि अंड्यांचा व्यवसाय हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. जर तुम्हाला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला ही माहिती माहित असणं खूपच गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुक्कुटपालनासाठी भरीव निधीची आवश्यकता असते. ते अनेकदा परवडणाऱ्या कर्जाच्या शोधात असतात. पण यासाठी कसं कर्ज काढायचे, किती रुपये कर्ज मिळते हे आपण जाणून घेणार आहोत...

कुक्कुटपालनासाठी किती कर्ज उपलब्ध आहे?

कुक्कुटपालन व्यवसायासाठी तुम्हाला किती कर्ज मिळू शकते हे बँकेवर आणि तुमच्या पात्रतेवर अवलंबून असते. अशा अनेक बँका आहेत ज्या कुक्कुटपालनासाठी कर्ज देतात. सध्या आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज दिले जाते ते आपण पाहणार आहोत. एसबीआय पशुसंवर्धन योजनेअंतर्गत शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना कर्ज देते. ही योजना भारत सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि नाबार्ड यांच्याद्वारे प्रशासित केली जाते.

या कर्ज योजनेअंतर्गत, विविध व्यवसायांसाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी असलेली कमाल रक्कम उपलब्ध आहे. विशेषतः कुक्कुटपालनाचा विचार केल्यास अंदाजित कर्जाची रक्कम १,००,००० ते ५,००,००० रुपयां पर्यंत असू शकते. तुम्ही कुक्कुटपालन शेड, कोंबड्या आणि औषधांसहित इतर उपकरणांसाठी कर्ज घेऊ शकता. पण तुमच्या गरजा आणि व्यवसायाच्या आकारानुसार कर्जाची रक्कम वाढू शकते. तुम्हाला आवश्यक असेल तेवढे कर्ज तुम्हाला मिळू शकते.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
Farmer Loan : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मुलीच्या लग्नासाठी मिळणार 0% व्याजाने कर्ज; कसा मिळवाल लाभ? वाचा सविस्तर

कुक्कुटपालनासाठी कोणती अनुदान योजना आहे का?

कुक्कुटपालनासाठी अनुदान योजना आहेत. सरकार देशातील शेतकरी आणि उद्योजकांसाठी अनेक अनुदान योजना राबव असतात. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. नाबार्डच्या पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंडाअंतर्गत तुम्हाला २५ टक्के ते ३३ टक्क्यापर्यंत सबसिडी मिळू शकते. जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड वापरून कर्ज घेतले आणि त्याची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला ३ टक्क्यापर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर

कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कुक्कुटपालन कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यांची आवश्यकता असेल. त्याचसोबत जमिनीचा दस्तऐवज, प्रकल्प अहवाल (तुमची संपूर्ण कुक्कुटपालन योजना आणि अंदाजित खर्च), स्थानिक प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यांचा समावेश आहे.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
SBI Stree Shakti Scheme: लाडक्या बहिणींना मिळणार २ कोटींचं कर्ज; व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI ची खास ऑफर

कुक्कुटपालन कर्जासाठी पात्रता काय आहे?

- कुक्कुटपालन कर्जासाठीच्या पात्रतेमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो.

- तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

- तुमचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. काही प्रकरणांमध्ये, हे वय ६५ वर्षांपर्यंत वाढू शकते.

- तुम्ही शेतकरी, पशुपालक किंवा ग्रामीण उद्योजक असणे आवश्यक आहे.

- कुक्कुटपालनासाठी तुमच्याकडे जमीन किंवा शेड असावे.

- कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावेत.

- तुमच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

- आधीपासून कोणतीही मोठी थकबाकी किंवा कर्ज नसावे.

- तुमचा सिबिल स्कोअर ६५० किंवा त्याहून अधिक असावा.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
Home Loan : दरवर्षी १ लाख एक्स्ट्रा भरल्याने होम लोन किती लवकर फेडता येईल? पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

पशुपालन कर्जासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया -

- सर्वात आधी तुम्ही संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत जा.

- बँक मॅनेजरला भेटा आणि पशुपालन कर्जाबद्दल (कुक्कुटपालन) माहिती विचारा आणि ते समजून घ्या.

- बँकेतून कर्जाचा अर्ज घ्या आणि सर्व आवश्यक माहिती वाचून व्यवस्थित भरा.

- अर्जात मागितलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडा.

- त्यानंतर पडताळणीसाठी बँकेचे अधिकारी तुमच्या शेताला किंवा जमिनीला भेट देऊन तुमच्या प्रकल्पाचा अहवाल तपासतील.

- चौकशीत सर्व गोष्टी बरोबर असल्याचे आढळल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर करण्यात येईल.

- कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल
Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com