SBI Stree Shakti Scheme: लाडक्या बहिणींना मिळणार २ कोटींचं कर्ज; व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI ची खास ऑफर

SBI Stree Shakti Loan: स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे. विशेष म्हणजे त्यांना व्याजदरात ०.५०% सवलतही दिली जाणार आहे. यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घ्या.
SBI Stree Shakti Loan:
SBI Stree Shakti Scheme loan up to ₹2 crore for women entrepreneurssaam tv
Published On
Summary
  • एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत महिलांना 2 कोटींपर्यंत कर्ज

  • एसबीआय स्त्री शक्ती कर्जासाठी महिलांची पात्रता काय

  • एसबीआय स्त्री शक्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

लाडक्या बहिणींसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी देशातील सर्वात मोठी बँकेनं खास ऑफर आणलीय. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. आपल्या 'स्त्री शक्ती योजने'अंतर्गत, SBI महिला उद्योजिकांना सवलतीच्या व्याजदराने आणि परतफेडीसाठी सोप्या हप्त्यांच्या सुविधेसह कर्ज उपलब्ध करून देते.

SBI Stree Shakti Loan:
Agricultural Loan: १ बिघा शेतजमीन असेल तर किती कर्ज मिळू शकते?

एसबीआय (SBI) महिलांना व्यापार, उत्पादन आणि ब्युटी पार्लरपासून ते फूड केटरिंगपर्यंतच्या सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी आर्थिक मदत पुरवत आहे. 'एसबीआय स्त्री शक्ती योजना' (SBI Stree Shakti Scheme) नेमकी काय आहे, त्याअंतर्गत कोणत्या सवलती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करावा, हे आपण जाणून घेऊ.

SBI Stree Shakti Loan:
एक म्हैस घेण्यासाठी किती कर्ज मिळू शकते? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

'स्त्री शक्ती योजना' काय आहे आणि किती मिळेल कर्ज?

ही एसबीआय (SBI) योजना महिला उद्योजिकांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर महिलांना व्याजदरात ०.५० टक्के पर्यंतची विशेष सवलत मिळते. यामुळे कर्जाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आह

व्यवसायानुसार खास ऑफर

हे कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रांतील व्यवसायांसाठी उपलब्ध आहे. गरजेनुसार, व्यवसाय खेळत्या भांडवलासाठीचे कर्ज (वर्किंग कॅपिटल लोन) आणि मुदत कर्ज (टर्म लोन) या दोन्ही प्रकारच्या कर्जांचा लाभ घेऊ शकतात. हे कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रांतील व्यवसायांसाठी उपलब्ध आहे. गरजेनुसार, व्यवसाय खेळत्या भांडवलासाठीचे कर्ज (वर्किंग कॅपिटल लोन) आणि मुदत कर्ज (टर्म लोन) या दोन्ही प्रकारच्या कर्जांचा लाभ घेऊ शकतात. तर ब्युटी पार्लर, स्पा किंवा सौंदर्यप्रसाधने (कॉस्मेटिक्स) क्षेत्रांत व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी 'श्रृंगार योजना' तयार करण्यात आलीय.

परतफेड आणि इतर फायदे

तुम्हाला हे कर्ज ७ ते १० वर्षांच्या कालावधी फेडावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करणे आणि कोणत्याही अतिरिक्त दबावाशिवाय कर्जाची परतफेड करणे शक्य होते. पात्र महिला उद्योजिकांना CGTMSE (सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट) योजनेअंतर्गत 'क्रेडिट गॅरंटी'चे (कर्ज हमीचे) सहाय्य मिळते. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, कोणतीही तारण मालमत्ता न ठेवता १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. साधारणपणे, अर्जदाराला एकूण कर्ज रकमेपैकी १५ ते २५ टक्के रक्कम स्वतःचा वाटा (मार्जिन मनी) म्हणून भरावी लागते.

कोणते कागदपत्रे लागतील?

पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ओळख पटवणारी इतर कागदपत्रे.

रहिवासी दाखला.

तुमची योजना किंवा प्रकल्प अहवाल.

गेल्या ३ वर्षांचे आर्थिक तपशील, प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) आणि गेल्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट.

कर्जासाठी कुठे आणि कसा अर्ज

तुम्ही SBI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या SBI शाखेला भेट देऊ शकता. महिलांना मदत करण्यासाठी शाखांमध्ये विशेष मदत कक्ष (हेल्प डेस्क) देखील उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com