Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर

Good News For Maharashtra Farmer: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर केली जाणार आहे.
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर
Good News For Maharashtra FarmerSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

  • शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होणार

  • कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांना लाभ

  • ईकेवायसीमुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीमध्ये राज्यातील जवळपास ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांना ५,०८० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे तांत्रिक अडचणी आणि केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारकडून आतापर्यंत कर्जमाफीच्या दोन यादी जाहीर करण्यात आल्या होत्या. या यादींमध्ये नाव न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा होती. मागच्या दोन याद्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे नाव तिसऱ्या यादीत येण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित केले जाण्याची शक्यता आहे. ईकेवायसीमुळे ज्या शेतकऱ्यांना मागच्या दोन याद्यांमध्ये लाभ मिळाला नाही त्या १ लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या खात्यावर देखील रक्कम जमा केली जाईल.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर
Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत नाव दिसलं नाही, बँकेतून घरी येताच शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीसंदर्भात मागच्या आठवड्यात माहिती दिली होती. राज्यातील ५३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे वचन देण्यात आले होते. राज्य सरकारने ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करुन शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे राज्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना वीज माफ केली आहे. पुढील ५ वर्षे त्यांना वीज बिल येणार नाही अशा पद्धतीचे काम सरकारकडून सुरू असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली होती.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर
Maharashtra Farmer : २ एकरात ३ पिके अन् १५ लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा 'हा' फॉर्म्युला पाहून कृषी तज्ञही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com