Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis: चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
chandrashekhar bawankuleSaam Tv
Published On
  • देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण

  • संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला बावनकुळेंनी दिले उत्तर

  • बावनकुळे यांनी फडणवीस २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, असा दावा केला

  • मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी 'अफवांचा बाजार' असे सांगितले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत खेचलं जाईल, या आदित्य ठाकरे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आले होते. अशातच संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राची सुत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात सोपवली जातील, असे विधान केले होते. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या विधानावर अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे नेतृत्व करत राहतील, असा टोला त्यांनी त्यांना लगावला.

बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. मी हे जाणीनपूर्वक सांगतो की देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कार्यकाळात राज्यात मोठे विकास उपक्रम आणि लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.'

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

बावनकुळे यांनी यावेळी मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये असा टोला विरोधकांना लगावला. त्यांनी सांगितले की, हा अफवांचा बाजार आहे. सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन म्हणावे लागेल. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये.' यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे एनडीएमध्ये येणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक दावा

मंत्री दत्ता भरणे यांनी देखील संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 'प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.' यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना भरणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहावेत, ही सर्वसामान्य जनतेसह माझीही इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकासाच्या दिशेने मोठी वाटचाल केली आहे.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

तसंच, 'पुढील काळातही त्यांनी राज्याला देशात क्रमांक एकावर नेण्यासाठी काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.' दत्ता भरणे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com