Maharashtra politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray Latest News : 'ऑपरेशन टायगर 3.0' सुरू असल्याचा दावा करत शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे १४ आमदार संपर्कात असल्याचे म्हटले. या दाव्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे?
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam Tv
Published On

Maharashtra politics, Uddhav Thackeray, Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार फुटल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ही राजकीय घडामोड ताजी असतानाच आता आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'ऑपरेशन टायगर' अजून सुरूच असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ठाकरेंच्या शिवसेनेचे २० पैकी १४ आमदार संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील मविआच्या बैठकीला ६० आमदारांपैकी ३७ आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, 'ऑपरेशन टायगर ३.०' सुरू झाले असून शिवसेनेचे (यूबीटी) १४ आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील. या ऑपरेशनच्या दाव्याबाबत पाटील यांच्या विधानाला शिवसेनेचे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी विरोध केला. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, असे कोणतेही ऑपरेशन सुरू नाही, मात्र मविआचे अनेक आमदार स्वतःहून शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे?
Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळात फेरबदल! बड्या नेत्यांचा पत्ता कट? श्रीकांत शिंदे, संजय पाटलांना लॉटरी; पाहा यादी
थोडा वेळ थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे येतील. एकनाथ शिंदे बोलत नाहीत, ते फक्त आपल्या दाढीवरून हात फिरवतात, हे खुद्द उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी कबूल केले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आपल्या दाढीवरून हात फिरवतील, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होईल.
- गुलाबराव पाटील

६ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ६ खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे नागपूरला गेले होते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्याच विमानातून ठाकरे नागपूरला गेले. आज ठाकरेंच्या यवतमाळ-वाशिम येथील सभेला विदर्भातील चारही आमदार उपस्थित राहतील, असे सांगितले जातेय.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे?
Mumbai local : मुंबई लोकल हत्याकांडातील धक्कादायक सत्य समोर; दारूच्या नशेत आरोपीने केला पोटात वार

ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या २० आमदार आहेत. पक्षात फूट पाडण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा १४ आहे. या २० आमदारांपैकी १० आमदार शहरातील आहेत. त्यात उद्धव यांचा मुलगा आदित्य आणि भाचा वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे. त्याशिवाय संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचाही समावेश आहे.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे?
मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल! बड्या मंत्र्यांना डच्चू; ठाकरेसेना फोडणाऱ्या शिंदेंसेनेला बक्षीस, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com