

सगळ्यांचीच घर खरेदी करण्याची इच्छा असते. एकदा घर खरेदी केलं की आपण दरमहा ठराविक रक्कम त्यात भरत असतो. घर खरेदीसाठी घेतलेलं होम लोन अनेक वर्षे सुरू राहतं. २० किंवा ३० वर्षांचा लोन टेन्योर असेल तर EMI भरताना मोठी रक्कम व्याजामध्ये जाते. मात्र, दरवर्षी नियमित EMI सोबत जास्त १ लाख रुपयांच्या कर्जाच्या प्रीपेमेंटसाठी भरल्याने लोनचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
इथे ८.५ टक्के वार्षिक व्याजदर गृहीत धरून हे कॅलक्युलेशन करण्यात आले आहे. दरवर्षी १ लाखांपेक्षा जास्त रक्कम वर्षाच्या शेवटी भरली जाते आणि EMI कमी करण्याऐवजी प्रीपेमेंटचा फायदा थेट लोनचा टेन्योर कमी करण्यासाठी घेतला जातो.
२० लाखांच्या लोनमध्ये वर्षाला १ लाख जास्त भरल्याने १५ वर्षांचे लोन ८ वर्षे ८ महिन्यांत संपण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास ६ वर्षे ४ महिन्यांची बचत होऊ शकते. २० वर्षांचे लोन १० वर्षात, तर ३० वर्षांचे लोन ११ वर्षात संपवता येऊ शकतो. ३० वर्षांच्या लोनमध्ये जवळपास १९ वर्षे कमी होऊ शकतात.
३० लाखांच्या कर्जासाठी दरवर्षी १ लाख जास्त भरल्याने १५ वर्षांचा लोन १० वर्षात, २० वर्षांचे लोन, ११ वर्षे ९ महिन्यांत, तर ३० वर्षांचा लोन १३ वर्षे १० महिन्यांत संपण्याचा अंदाज आहे.
५० लाखांच्या लोनमध्ये १५ वर्षांचा टेन्योर ११ वर्षे ६ महिने, २० वर्षांचे लोन १४ वर्षे, तर ३० लाखांचे लोन १७ वर्षात पूर्ण होऊ शकतं.
होम लोनच्या सुरुवातीच्या काळात EMI मधला मोठा भाग व्याजासाठी जातो. अतिरिक्त १ लाख थेट मूळ रक्कम म्हणजेच प्रिन्सिपल कमी करते. त्यामुळे पुढच्या काळात कमी रकमेवर व्याज आकारलं जातं आणि लोनचा कालावधी झपाट्याने कमी होतो. त्यामुळे बोनस, इन्क्रीमेंट किंवा इतर जास्त उत्पन्नातून दरवर्षी काही रक्कम होम लोनच्या प्रीपेमेंटसाठी वापरणं फायदेशीर ठरू शकते. मात्र, प्रत्यक्ष बचत तुमच्या व्याजदर, प्रीपेमेंटच्या वेळा आणि कर्जाच्या अटींनुसार बदलू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.