PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

New PAN Card Rules For Post Office Withdrawal 2026: पोस्ट ऑफिस व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन आयकर नियम 2026 नुसार पैसे जमा आणि काढण्यासाठी नव्या अटी लागू करण्यात आल्या आहेत.
Customers at a post office counter as new PAN card rules for financial transactions come into effect across India.
Customers at a post office counter as new PAN card rules for financial transactions come into effect across India.saam tv
Published On

पॅन कार्डधारक तसेच पोस्ट ऑफिस खातेदार आणि विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडिया पोस्टने देशभरातील पोस्ट ऑफिसासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता खाते किंवा योजनांमधील पैसे जमा करणे आणि काढणे यासाठी काही अटी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. आता नवीन प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफीस खात्यातून काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी तसेच कोणत्याही बचत योजेनेतून पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पॅन कार्ड नसल्यास व्यवहार करता येणार नाही. निर्णय आयकर अधिनियम 2026 मधील नियमांनुसार घेण्यात आला आहे.

Customers at a post office counter as new PAN card rules for financial transactions come into effect across India.
Gold-Silver Price Hike: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता सोनं-चांदी खरेदी करणं आणखी महागणार

आयकर अधिनियम 2026 मधील नियम 159,160,161,211 आणि 237 अंतर्गत हे बदल लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोस्ट ऑफिस खाते उघडणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे किंवा इतर कोणताही व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक झाले आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही त्यांनी ते लवकरात लवकर बनवून घ्यावे.

Customers at a post office counter as new PAN card rules for financial transactions come into effect across India.
नाशिक पिंपरी चिंचवडमध्येही CNG चे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागतील?

या बदलामुळे पोस्ट ऑफिसच्या कामकाजात पारदर्शकता वाढणार आहे. विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे सोपे होईल आणि आयकर (Income Tax) लपवणाऱ्यांवर चाप बसेल. दरम्यान ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही त्यांच्यासाठी काही पर्यायी अटी लागू करण्यात आल्या आहेत. अशा वेळी व्यवहारासाठी फॉर्म 60 ऐवजी फॉर्म 97 भरावा लागेल. या फॉर्मसोबत व्यवहार करणाऱ्याचे नाव, पत्ता, व्यवहाराचा प्रकार आणि संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. जेणेकरून पॅनशिवाय केलेले व्यवहारही कर प्रणालीत नोंदवले जातील.

Customers at a post office counter as new PAN card rules for financial transactions come into effect across India.
HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

तसेच पोस्ट ऑफिस व्यवहारांसाठी आता फॉर्म 15G आणि 15H ऐवजी फॉर्म 121 भरावा लागणार आहे. याआधी व्याजावरील TDS टाळण्यासाठी हे फॉर्म वापरले जात होते. मात्र आता जर करदात्याचे अंदाजे करपात्र उत्पन्न शून्य असेल, तर फॉर्म 121 भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com