Sunday Horoscope: अडकलेले पैशाचे व्यवहार मार्गी लागतील, ५ राशींच्या घरात आनंदाचे वातावरण राहील; आजचे राशीभविष्य

Rashi Bhavisha Today: 12 राशींसाठी येणारा महिन्याचा पहिलाच रविवार कसा जाणार हे जाणून घेण्यासाठी वाचा खास राशीभविष्य.
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

मेष

आज अनेक कामं पूर्ण होण्याची चिन्हं दिसतील. घरातील वातावरण शांत राहील आणि जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल. ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल.

वृषभ

आज थोडा आळस जाणवू शकतो. कामात मन उशिरा लागेल आणि शरीरही थकल्यासारखं वाटेल. छोट्या-छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.

मिथुन

आज तुमच्या बोलण्यामुळे कामं सहज होतील. एखादा फोन किंवा मेसेज फायदेशीर ठरू शकतो. कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करणं आवश्यक आहे.

कर्क

घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका, शांत राहणं महत्त्वाचं आहे. खर्च करताना थोडं सावध राहणं फायदेशीर ठरेल.

सिंह

आज तुम्ही उत्साही आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. मात्र, अनावश्यक खर्च आणि दिखावा टाळा.

horoscope in marathi
Chanakya Niti: हरलेला डाव कसा जिंकाल, चाणक्यांनी दिल्या कठीण काळात सावरण्याच्या टिप्स

कन्या

कामात तुमची पकड मजबूत राहील. ऑफिसमध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. घरातही वातावरण स्थिर आणि सकारात्मक राहील.

तुळ

आर्थिक बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक

आज नशीब तुमच्या बाजूने असेल. अडकलेली कामं पुढे सरकतील आणि प्रवासाचे योग येऊ शकतात. मन शांत राहील, त्यामुळे निर्णय योग्य घेता येतील.

धनु

आज तुमचं मत लोक मान्य करतील. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे आणि नात्यांमध्ये सुधारणा दिसेल. आर्थिक बाबतीत नियोजन करून चालणं गरजेचं आहे.

मकर

मन थोडं अस्वस्थ राहू शकतं आणि विचार वाढू शकतात. काम पूर्ण होईल, पण लक्ष विचलित होऊ शकतं. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

कुंभ

आजचा दिवस सकारात्मक राहील. आर्थिक संधी मिळू शकतात आणि ओळखीच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. छोटा प्रवासही होण्याची शक्यता आहे.

मीन

आज निर्णय घेताना सावध राहणं आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. आरोग्य आणि प्रवासात काळजी घेणं गरजेचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

horoscope in marathi
Mango Side Effects: आंबे खाल्याने पिंपल्स येतात? डाएटिशियनने सांगितला हा घरगुती उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com