साम टिव्ही ब्युरो
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
वृषभ : प्रवासामध्ये विशेष काळजी घ्यावी. कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.
मिथुन : नवे स्नेहसंबंध जुळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.
कर्क : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.
सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुयश लाभेल.
तुळ : दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान संभवते.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मकर : इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.
कुंभ : आत्मविश्वास वाढेल. महत्वाच्या कामात सुयश मिळवाल.
मीन : आत्मविश्वास कमी राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.