Mango Side Effects: आंबे खाल्याने पिंपल्स येतात? डाएटिशियनने सांगितला हा घरगुती उपाय

Mango Side Effects On Skin: आंबे खाल्याने पिंपल्स येतात. याचं कारण म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने आंबे खात आहात. डॉक्टरांनी याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.
Mango Side Effects On Skin
Mango Side Effects google
Published On

उन्हाळा आला की, फळांचा उत्सव साजरा होतो असं आपण म्हणू शकतो. बाजारात पाहिलत तर तुम्हाला आंबे, फणस, जांभूळ, कलिंगड अशी विविध आणि चवदार फळं पाहायला मिळतात. पण सगळ्याच फळांचे जास्त प्रमाणात सेवन हे चुकीचं ठरु शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

मे महिना हा खास म्हणजे आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला महिना किंवा हंगाम आपण म्हणू शकतो. या महिन्यात प्रत्येकाच्या रोजच्या आहारात आंब्याची एकतरी फोड असतेच. पण काहींना आंबे खाल्यानंतर पिंपल्सच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

Mango Side Effects On Skin
Cancer Risk: कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कोणत्या रुग्णांना जास्त असतो? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

डॉक्टरांचे मत काय?

Dietitian एक्सपर्टच्या मते, आंबे खाल्याने पिंपल्स वाढतात असं नाही, तर त्याची योग्य पद्धत माहित असणे गरजेचे आहे. आंबे खाताना योग्य वेळ आणि योग्य कॉम्बिनेश असणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील मुद्दे समजून घ्या आणि फॉलो करा.

आंबे खाल्यावर पिंपल्स कधी वाढतात?

1. जास्त प्रमाणात आंबे खाणे.

जेव्हा तुम्ही दिवसाला एकापेक्षा जास्त आंबे चव लागते म्हणून खात, तेव्हा तुमच्या शरीरातली शुगर वाढते आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर पडतो.

2. चुकीचे पदार्थ खाणे.

तुम्ही जर खूप तेलकट पदार्थांसोबत किंवा मसालेदार पदार्थांसोबत आंबे खाता. तेव्हा तुमच्या स्कीनवर परिणाम होऊ शकतो.

३. चुकीच्या वेळी आंबे खाणे.

रिकाम्या पोटी आंबे खाणे किंवा रात्री आंबे खाल्ल्याने काहींच्या पचनावर किंवा हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसाला १ आंबा खाऊ शकता. तसेच जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यानंतर तुम्ही आंबे सेवन करु शकता. त्याने चेहऱ्यावर कोणत्याच समस्या जाणवत नाहीत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Mango Side Effects On Skin
Jio Cheapest Recharge : Jioचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लान, मिळेल 6GB डेटा अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com