50MP कॅमेरा अन् 12GB रॅमसह Nothing Phone 2a Special Edition लाँच; जाणून घ्या किंमत

Nothing Phone 2a Special Edition Price: प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी नथिंगने Nothing Phone 2a Special Edition स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन उत्तम क्वालिटी आणि फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे.
Nothing Phone 2a Special Edition
Nothing Phone 2a Special EditionGoogle

प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Nothing ही देशातील अनेक कंपन्याशी स्पर्धा करत आहे. Nothing कंपनी हाय क्वालिटी आणि उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच Nothing Phone 2a चा नवीन व्हेरियंट लाँच केला आहे. या नवीन फोनचे नाव Nothing Phone 2a Special Edition असे आहे. यामध्ये तुम्हाला रेड, यलो, ब्लू, व्हाईट आणि ग्रे असे कलर ऑप्शन मिळतील.

कंपनीने या डिव्हाइसला ट्रान्सफरन्ट ठेवले आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनचे काही मर्यादित डिव्हाइस लाँच केले आहे. हा स्मार्टफोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करु शकता.

किंमत

Nothing Phone 2a Special Edition स्मार्टफोनमध्ये 12GB RAM+ 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत २७,९९९ रुपये आहे. या हँडसेट ५ जूनपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

Nothing Phone 2a Special Edition स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. यात तुम्हाला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. हा 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रिन प्रोटेक्शनसाठी हँडसेटला गोरिल्ला ग्लास 5 लावण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असून Nothing OS 2.5 वर काम करतो.

Nothing Phone 2a Special Edition
PM Modi: प्रचार संपल्यानंतर PM मोदी करणार ध्यानधारणा, यंदा तामिळनाडूत जाणार; कसं असणार शेड्युल?

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचसोबत 50MP+50 MP ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 32 MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 45W वायर्ड चार्जिंगसोबत येतो.

Nothing Phone 2a Special Edition
Gold Silver Price Hike : लोकसभेच्या निकालाआधीच सोन्याचा भाव वाढला; चांदीही महागली, तपासा आजचे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com