प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली
देशात लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पडणार आहे. आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान करतात. यंदाही ते करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री तमिळनाडू्ला जाणार आहेत. कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान ध्यान धारणेला बसणार आहेत.
आजपासून पुढचे ४८ तास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी प्रशासनाकडून तयारी केली गेली आहे. जवळपास २ हजार पोलिसांचा बंदोबस्त पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या ध्यानधारणेदरम्यान विविध सुरक्षा यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. २०१९ ची निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी केदारनाथला गेले होते. यंदा ते तामिळनाडुला जात (PM Modi Will Meditate) आहेत.
मोदींच्या ध्यानधारणेवरून विरोधकांनी घेरलं
३० मेच्या संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यान करणार आहेत. याच ठिकाणी (Vivekananda Rock Memorial) विवेकानंद यांना 'मदर इंडिया'बद्दल दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती, असं म्हटलं गेलं होतं. मोदींच्या ध्यानधारणेवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी मोदींच्या सुरक्षेसाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसने निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयोगात धाव घेत आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाने देखील ही ध्यानधारणा वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह दाखवली, तर निवडणूक आयोगात जाऊ असा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवरून वातावरण तापण्याची आता शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपत आहे. पंतप्रधान मोदी आज तामिळनाडूमध्ये ध्यानस्थ बसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.