सागर निकवाडे
नंदुरबार : काही प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता. या संपानंतर शासनाने (Anganwadi Workers) अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मोबाईल हँडसेट व इतर सुविधा देण्याचे निश्चित केले असून (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिले जाणार आहे. (Breaking Marathi News)
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे २ हजार ५६३ अंगणवाड्यांचे कामकाज बंद होते. यामुळे गरोदर आणि स्तनदा मातांसह ३ ते ६ वयोगटातील बालके (Poshan Aahar) पोषण आहारापासून वंचित होती. संपामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण, बालकांचे आरोग्य तपासणी, लसीकरण हे देखील ठप्प होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळणार असल्यामुळे दुर्गम भागातील अंगणवाडी सेविकांना याच्या लाभ होणार आहेत. स्मार्टफोन आल्याने कामकाज देखील गतिमान होणार तसेच प्रत्येक सेविकेची माहिती ऑनलाईन येणार असून जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण यावर देखील मात करण्यास ही योजना कारगर ठरणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.