Union Budget 2026
New Income Tax ActSaam Tv

New Income Tax Act: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा! नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू

New Income Tax Act Implemented from 1st April 2026: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. नवीन आयकर कायदा हा १ एप्रिलपासून लागू केला जाणार आहे.
Published on

New Income Tax Act: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठी धोषणा केली आहे. करदात्यांना दिलासा दिला आहे. आता नवीन इन्कम टॅक्स कायदा हा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. यामुळे आयटीआर फाइल करणे आणखी सोपे होणार आहे. नवीन कायद्यानुसार आयकरचे नियम खूप सोपे झाले आहेत. या नवीन आयकर कायद्यानुसार आता इथून पुढे आयकर फाइल करता येणार आहे.

Union Budget 2026
Budget : काय स्वस्त आणि काय महाग? स्मार्टफोनपासून ते होमलोन, या १० गोष्टींकडे लक्ष

नवीन आयकर कायदा काय आहे? (What is New Income Tax Bill)

नवीन आयकर कायदा हा १ एप्रिलपासून लागू होणार आहे. ६० वर्षांपूर्वीच्या १९६१ च्या प्राप्तिकर कायद्यात पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे. यामध्ये आयकरचे नियम सोपे झाले आहेत.याआधी आयकर कायद्यात ५३६ प्रकरणे होती. आता फक्त २३ प्रकरणे असणार आहे. अनावश्यक जुन्या तरतूदी काढून टाकण्यात आले आहेत.

याआधी आयकर कायदा समजून घेणे खूप अवघड होते. खूप किचकट भाषा होती. आता प्राप्तिकर कायद्यातील भाषा सोपी करण्यात आली आहे. यामुळे आयटीआर फाइल करताना करदात्यांना खूप फायदा होणार आहे. आयटीआर फाइल करण्याची प्रोसेसदेखील खूप सोपी होणार आहे.

Union Budget 2026
Budget 2026: टॅक्स,रोजगाराचं काय होणार? देशाच्या अर्थसंकल्पात सामान्य लोकांना दिलासा मिळणार?

आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवली (ITR Filling Deadline Extended)

आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आता आयटीआर १ आणि आयटीआर २ फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असणार आहे. नॉन ऑडिट किंवा व्यावसायिकांना आयटीआर फाइल करण्यासाठ मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

अपघातानंतर विम्यावर टॅक्स नाही (No Tax Deduction on Accindet Insurance)

अर्थसंकल्पात अजून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता अपघात झाल्यानंतर लागू होणाऱ्या विम्यावर टॅक्स आकारला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अपघातील विमा पूर्ण मिळणार आहे. त्यामध्ये कोणतेही टॅक्स डिडक्शन होणार नाही.

Union Budget 2026
Income Tax Refund Delay: ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट, काय आहे कारण? परतफेडीवर व्याज मिळेल का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com