CNG Price : गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामन्यांना झटका

Mumbai CNG Price : मुंबई आणि MMRमध्ये १ ऑक्टोबरपासून CNG दरात १ रुपया प्रति किलोने वाढ झाली असून नवा दर ८९ रुपये झाला आहे. MGL ने वाढलेल्या इनपुट गॅस खर्चामुळे दरवाढ केल्याचे सांगितले आहे.
CNG PNG Rate Hike Today News
CNG PNG Rate Hike Today News AI Image
Published On: 

CNG PNG Rate Hike Today News : गॅस सिलिंडरच्या किंमतीनंतर आता मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचे दरही वाढल्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर महागाईचा दुहेरी भार पडला आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) १ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात १ रुपया प्रति किलोची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत सीएनजीचा नवा दर आता ८९ रुपये प्रति किलो झाला आहे.

सणासुदीच्या काळात एलपीजी सिलिंडर आणि सीएनजी दोन्ही महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांचे मासिक बजेट पार कोलमडणार आहे. आज सकाळीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर सीएनजी महागलाय. सणासुदीच्या काळात एसी, टीव्ही फ्रीजपासून ते साखर, दाळी यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची अंदाज वर्तवला जात आहे. पुढील काही दिवसांत महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

CNG PNG Rate Hike Today News
Shiv Bhojan : शिवभोजन योजनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नवीन GR जारी, आताच जाणून घ्या नियम

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) देशांतर्गत गॅस आणि आयात केलेल्या आरएलएनजीच्या वाढलेल्या किमतींचे या दरवाढीमागे काऱण दिले आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगर प्रदेशात १ ऑक्टोबरपास सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ केली आहे.एमजीएलने किरकोळ दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ केल्यामुळे आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) नागरिकांना आणि वाहनचालकांना सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

CNG PNG Rate Hike Today News
Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सीएनजी महाग का झाला आहे?

एमजीएलने सांगितले की, कच्च्या मालाच्या वाढलेल्या खर्चामुळे ही दरवाढ झाली आहे. कंपनीने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायू तसेच आयात केलेल्या पुनर्वायूकृत द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या (आरएलएनजी) किमतींचे कारण दिले. सीएनजीच्या वाढीव मागणीचा मोठा वाटा स्पॉट आरएलएनजीद्वारे पूर्ण केला जात आहे. आयात केलेल्या आरएलएनजीच्या किमती आंतरराष्ट्रीय गॅस बाजाराशी निगडित असल्याने, वाढलेल्या जागतिक किमतींमुळे कंपनीचा खरेदी खर्च वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com