LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?

LPG Gas Cylinder Rule Change: एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. पीएनजी कनेक्शन घेणाऱ्यांना ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे.
LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?
LPG Gas Cylindersaam tv
Published On
  • एलपीजी सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल करण्यात आला

  • केंद्र सरकारने एलपीजीच्या नियमात बदल केले

  • पीएनजी कनेक्शन घेणाऱ्यांना ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार

एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये मोठा बदल केला. केंद्र सरकारने नवा नियम लागू करत स्पष्टपणे सांगितले की, पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ३० दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. जर असं केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

पीएनजी कनेक्शन घेणाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत एलपीजी कने्शन परत करावे. हा नियम इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या ग्राहकांना लागू होणार आहे. याचा उद्देश दुहेरी कनेक्शन बंद करणे हा आहे. त्याचसोबत अनुदानात सुधारणा करणे आणि ज्या ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये पाईपद्वारे गॅस उपलब्ध नाही त्याठिकाणी गॅस सिलिंडरचा पुरवठा करणे हा आहे.

LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?
LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या; मोदी सरकारने घेतलेले 'हे' ३ मोठे निर्णय जाणून घ्या

मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा आदेश २०२६ जारी केले होते. या सुधारित नियमांनुसार, पीएनजी केनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना ३० दिवसांच्या आत त्यांचे सध्याचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. म्हणजे, जर एखाद्या कुटुंबाने १ जून रोजी पीएनजी कनेक्शन घेतले. तर त्यांना १ जुलैपर्यंत आपले एलपीजी खाते बंद करणे बंधनकारक आहे. जर ही मुदत पाळली गेली नाही तर एलपीजी रिफिलवर बंदी येऊ शकते आणि तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते.

LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?
LPG Rules 2026 Update : LPG नियमात पुन्हा बदल, पाईप गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

नोकरी किंवा शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या लोकांच्या सोयीचा विचार करून सरकारने विशेष तरतुदीही केल्या आहेत. अशा ग्राहकांना एलपीजी कनेक्शन परत केल्यानंतर एक ट्रान्सफर व्हाउचर दिले जात आहे. याअंतर्गत जिथे पीएनजी सुविधा उपलब्ध नाही तिथे पुन्हा तुम्हाला एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी मदत होईल. यामुळे भाडेकरू, विद्यार्थी, मजूर, स्थलांतरित कामगार आणि बदलीच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांची चिंता कमी होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या नियमांनुसार ग्राहक त्यांच्या श्रेणी आणि क्षेत्रानुसार २५ दिवस, ३५ दिवस किंवा ४५ दिवसांच्या अंतराने गॅस सिलिंडर बुक करू शकतात. सध्याच्या नव्या नियमानुसार, आता डिलिव्हरी एजंट गॅस सिलिंडर सुपूर्द करण्यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी द्यावा लागेल. तर त्यांना गॅस सिलिंडर मिळेल.

LPG Rule Change: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा की झटका?
LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com