LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या; मोदी सरकारने घेतलेले 'हे' ३ मोठे निर्णय जाणून घ्या

LPG Cylinder Price Hike: मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत 3 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. उज्ज्वला योजनेतल्या अनुदानित सिलेंडरची संख्या कमी झाली असून घरगुती गॅसच्या किंमतीतबी वाढ करण्यात आली आहे.
LPG Cylinder Price Hike
LPG Cylinder Price Hikegoogle
Published On

सध्या महागाईचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे. त्यातच LPG गॅस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार झाल्यामुळे आता गॅस सिलेंडच्या ही किंमतींवर परिणाम होताना दिसत आहे. मोदी सरकारने जून महिन्यात LPG सिलेंडर संदर्भात सलग तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसोबत उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांवर सुद्धा आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सर्वात मोठा बदल प्रधानमंत्री उज्जवला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत करण्यात आलाय. याआधी या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वर्षाला ९ एलपीजी सिलेंडर दिले जात होते. आता ही मर्यादा कमी करून फक्त ४ सिलेंडरपर्यंत करण्यात आली आहे. ही योजना २०१६मध्ये सुरु करण्यात आली होती.

LPG Cylinder Price Hike
Vitamin E Capsule For Face : चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने मिळतात हे 8 जबरदस्त फायदे, ग्लोइंग स्कीनचं खास सिक्रेट

तेव्हा सुरुवातीला यामध्ये १२ सिलेंडर दिले जात होते. त्यानंतर ही संख्या नऊवर आणण्यात आली आणि ती आता थेट चार केली आहे. सरकारकडून प्रति सिलेंडर ३०० रुपयांचं अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण सिलेंडरची संख्या कमी झाल्याने बऱ्याच कुटुंबांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारने १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये २९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये या सिलेंडरच्या किंमती ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे मागच्या तीन महिन्यांमध्ये ही दुसरी दरवाढ आहे. याआधी मार्च महिन्यातही सिलेंडरच्या किंमतींमध्ये ६० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

तर तिसरा मोठा निर्णय म्हणजे , हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबांमध्ये जाणाऱ्या १९ किलोच्या कर्मशिअल सिलेंडरची किंमत ४२ रुपयांनी वाढून दिल्लीमध्ये याचे दर ३,११३.५० रुपये झाली आहे. याआधी हा सिलेंडर ३,०७१.५० रुपयांना उपलब्ध होता. तसेच ५ किलोच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरातही ११ रुपयांची वाढ होऊन त्याची किंमत ८.२१.५० रुपयांवर पोहोचली आहे.

पश्चिम आशियातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल आणि एलपीजीच्या किंमती वाढतायेत. सरकारच्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांना एलपीजी विक्रीवर प्रति सिलेंडर सुमारे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे घेतलेल्या या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार असल्याचं दिसून आलं आहे.

LPG Cylinder Price Hike
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com