8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Government Employees Salary Hike : आठव्या वेतन आयोगाकडे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत आता आयोगात चर्चा सुरु आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissiongoogle
Published On

आठव्या वेतन आयोगाबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारक आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागण्या करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये विविध विभागातून विविध मागण्या आलेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्याही मागण्या वाढल्या आहेत. वाढती महागाई पाहता फिटमेंट फॅक्टरही वाढायला हवा अशा त्यांच्या मागण्या आहेत. त्यातच जम्मू- काश्मीर जनरल लाइन टिचर्स फोरम (jkgltf) आयोगाअंतर्गत शिक्षकांच्या आणि कर्मचार्‍यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे.

शिक्षकांच्या मागण्या

जम्मू- काश्मीर जनरल लाइन टिचर्स फोरम (jkgltf) या संघटनेने बेसिक सॅलरीत वाढ, जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरु करणं, तसेच वैद्यकीय भत्ता आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करणं यासह अनेक मागण्या केल्या आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.

8th Pay Commission
Monsoon Update : मान्सून अडखळला! संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

शिक्षक महागाई भत्ता

शिक्षकांचं म्हणणं आहे की, गेल्या काही वर्षांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढतेय. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक गरजा आणि सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन एक फिटमेंट फॅक्टर ठरवला पाहिजे.

जुनी पेन्शन योजना

पेन्शन धारकांचं म्हणणं आहे की, जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सूरू करावी. कारण संघटनेच्या मते, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणार्‍या कर्मचार्‍यांच्या भविष्याला घेऊन कोणतीच निश्चितता नाही. त्यामुळे OPS सुरु केल्याने गॅरंटीड पेन्शन व्यवस्था दिली जाईल. त्याने रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल.

या संघटनेने साल २००९ मध्ये जनरल लाइन शिक्षकांच्या वेतनामधील मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये वरिष्ठ शिक्षकांना जुनियर शिक्षकांपेक्षा कमी बेसिक सॅलरी असल्यांचही आढळलं. त्यामुळे या तक्रारी सोडल्या पाहिजेत अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत. त्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी जास्त मागण्या केल्या आहेत. त्यांच्या भत्तात वाढ केली पाहिजे. कारण महागाईमुळे वाहतूक. वैद्यकीय सुविधा, विशेष रजा आणि कराची सवलत त्यांना दिली पाहिजे अशा मागण्या आहेत.

8th Pay Commission
Vitamin E Capsule For Face : चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने मिळतात हे 8 जबरदस्त फायदे, ग्लोइंग स्कीनचं खास सिक्रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com