Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

New Rules From 1st June 2026: 1 जूनपासून UPI, LPG, PAN कार्ड, ATM च्या व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी हे बदल खूप महत्वाचे आहेत.
June 1 Rule Change
June 1 Rule Changegoogle
Published On

New Rules From 1st June 2026: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना अनेक बदलांना सामोरं जावं लागेल. आजपासून युपीआयचे नियम, LPG चे नियम आणि बॅंकींग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये महागाई वाढणार की सुविधा वाढणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष होतं. पुढील माहितीत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आजपासून तुमच्या दैनंदिन आणि महत्वाच्या कामातले नवे नियम समजून घेऊन कामं करा. गॅस पाइप लाइन वापरणाऱ्यांसाठी, ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी, एटीएमचा वापर करणाऱ्यांसाठी, ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे .

June 1 Rule Change
Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

पेट्रोल, डिझेल आणि ATF वरील एक्सपोर्ट शुल्क कमी

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन ( ATF ) यांच्या निर्यातीवरचे शुल्क कपात केले आहे. आजपासून पेट्रोलवर १.५ रुपये, डिझेलवर १३.५ रुपये आणि एटीएफवर ९.५ रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल.

रेल्वेचे नवीन वेळापत्रक

आजपासून चैन्नईतील रेल्वेपासून अनेक मार्गांवरच्या रेल्वे सेवांचं नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. २०० पेक्षा जास्त गाड्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. प्रवाशांना ही माहिती अधिकृत रेल्वे अॅपवर मिळेल.

PAN कार्ड नियमात बदल

आजपासून ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य राहणार नाही. पण २० लाखांपेक्षा जास्त मालमत्ता व्यवहार आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी PAN Card आवश्यक असेल.

ATM आणि बॅंकिंग सेवांवरील शुल्क

बऱ्याच बॅंकानी एटीएम वापरण्यावर काही कठोर नियम लागू केले आहेत. मोफत व्यवहारांची लिमिट संपल्यानंतर तुम्हाला पैसे काढताना, मिनि स्टेटमेंट आणि बॅलन्स चेक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू शकतात.

June 1 Rule Change
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

UPI व्यवहार जास्त सुरक्षित होणार

आता UPI वापरणाऱ्यांचा व्यवहार जास्त सुरक्षित होण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. आता UPI ने पैसे पाठवण्याआधी लाभार्थ्याचे बॅंकेत नोंदवलेले नाव दिसणार आहे. हाच नियम Google Pay, PhonePe आणि Paytmसह इतर प्रमुख UPI प्लॅटफॉर्मवर लागू होणार आहे.

LPG ग्राहकांसाठी १ जूनपासून मोठे बदल

१ जूनपासून १९ किलोच्या कर्मशियल एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये ४२ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याची किंमत ३,११३.५० रुपये झाली आहे. पण १४. ४२ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताच बदल होणार नाही. तसेच, घरात PNG कनेक्शन सुरू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत LPG कनेक्शन सरेंडर करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com