LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

How To Check LPG Cylinder Delivery Status Online India: LPG सिलेंडर बुक केल्यानंतर तो कधी येणार याची चिंता आता संपली आहे. मोबाईल अ‍ॅप, वेबसाइट, SMS आणि IVRS द्वारे तुम्ही लाईव्ह डिलिव्हरी स्टेटस, डिस्पॅच अपडेट आणि अंदाजे वेळ सहज तपासू शकता.
Customer checking LPG cylinder delivery status on mobile app in real time
Customer checking LPG cylinder delivery status on mobile app in real timesaam tv
Published On

LPG सिलेंडर बुक केल्यानंतर तो घरी कधी पोहोचेल याची आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच सिलेंडरची लाईव्ह लोकेशन, डिलीव्हरी स्टेटस आणि अंदाजे पोहोचवण्याचे वेळ सहज तपासू शकता. इराण आणि इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम आजही अनेक भागांत दिसून येत आहे. काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सिलेंडर डिलिव्हरी उशिरा होत आहे. त्यामुळे सिलेंडर बुक केल्यानंतर ते नेमके कधी मिळणार हा प्रश्न ग्राहकांना पडतो. मात्र आता काळजी करण्याचे काम नाही. कारण तुम्ही घरबसल्या तुमच्या सिलेंडरची स्थिती तपासू शकता.

Customer checking LPG cylinder delivery status on mobile app in real time
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! ₹2 लाख जमा करा, फक्त इतक्या वर्षात मिळेल ₹89,990 व्याज; सरकारची गॅरंटी

आता फोनवरच मिळतील सर्व अपडेट्स

गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे सिलेंडर बुक झाला आहे का, डिस्पॅच झाला आहे का किंवा डिलिव्हरीसाठी निघाला आहे का याची माहिती मिळते. त्यामुळे डिलिव्हरीबाबतची अनिश्चितता कमी होते.

मोबाईल अ‍ॅपद्वारे ट्रॅकिंग

Indane, HP Gas आणि Bharat Gas या कंपन्यांचे अधिकृत मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहेत. ग्राहकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करावे.

लॉगिन केल्यानंतर My Booking, Track Cylinder अशा पर्यायांमध्ये जाऊन तुम्ही बुक केलेल्या सिलेंडरची स्थिती पाहू शकता. येथे बुकिंगची तारीख, डिस्पॅच अपडेट आणि डिलिव्हरीशी संबंधित माहिती दिसते.

Customer checking LPG cylinder delivery status on mobile app in real time
Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

वेबसाइटवरूनही मिळेल माहिती

जर तुम्हाला अ‍ॅप वापरायचे नसेल, तर संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही सिलेंडर ट्रॅक करता येतो. यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा LPG ID आवश्यक असते. माहिती भरल्यानंतर स्क्रीनवर सिलेंडरची सध्याची स्थिती दिसते.

SMS आणि कॉलद्वारेही तपासा स्टेटस

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ते SMS आणि IVRS सेवेद्वारेही माहिती मिळवू शकतात. बुकिंगवेळी मिळणाऱ्या मेसेजद्वारे अपडेट मिळत राहतात. तसेच IVRS नंबरवर कॉल करूनही ग्राहक सिलेंडरची स्थिती जाणून घेऊ शकतात.

Customer checking LPG cylinder delivery status on mobile app in real time
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

या नंबरवर करा संपर्क

Indane Gas: 7718955555

HP Gas: 7903105555

Bharat Gas: 7715012345

या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग, रवाना झाले की नाही आणि डिलिव्हरीबाबतची माहिती सहज मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com