Manasvi Choudhary
विमानाने प्रवास करणे हा प्रत्येक प्रवाशासाठी एक अतिशय उत्साहाचा आणि खास अनुभव असतो
विमानतळावर पोहोचल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे क्षण कॅमेऱ्यात टिपणे, रिल्स बनवणे किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंग करणे अनेकांना आवडते.
विमानाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी सरकारने नवे पाऊल उचललं आहे.
विमानतळावर रिल्स बनवणे, फोटो काढणे व ब्लॉग बनवणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
DGCA ने विमानतळांच्या सुरक्षेसाठी हा नियम सुरू केला असलून याची अंमलबजावणी करणं महत्वाचे असणार आहे.
नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर मोठी कारवाई करण्यात येणार असून त्यांचा मोबाईल जप्त होईल अशी माहिती आहे. तसेच त्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकणार असल्याची माहिती आहे.
सुरक्षा तपासणी केंद्र आणि रनवे आणि बोर्डिंग गेट्स अशा विमानतळावरील या परिसरात रिल्स, फोटो काढण्यास बंदी असणार आहे.
व्यावसायक जाहिराती आणि इनफ्ल्युएन्सर कंटेटसाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.