

प्रत्येकाला गुंतवणूक करण्याची गरज असते. भविष्यात कोणत्याही अडचणीच्या वेळीस जमा केलेले पैसे खूप उपयोगी पडतात. कारण महत्वाच्या वेळेस कोणाकडे मदत मागितली किंवा रिटायरमेंटनंतर खर्चाची सोय नसली तर कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे तुम्ही भविष्यासाठी थोडी रक्कम बँकेच ठेवून त्यावर भरघोस व्याज मिळवू शकता. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस व्याज मिळतं.
सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची (Post Office Time Deposit ) टाइम डिपॉझिट योजना सर्वात जास्त फायदेशीर मानली जात आहे. यामध्ये या योजनेवर केंद्र सरकारची गॅरंटी असल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील. नुकतेच रिझर्व्ह बँकेने रेपोच्या दरात कपात केल्यानंतर बऱ्याच बँकांनी मुदत ठेव (FD) योजनांवरचे व्याज कमी केले आहे. पण पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेचे व्याजदर कायम ठेवण्यात आलाय.त्यामुळे ही सुवर्णसंधी अजिबात चुकवू नका.
पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये १ वर्षे, २, ३ आणि वर्षांच्या कालावधीसाठी टाइम डिपॉझिट खातं उघडता येतं.तुम्ही १ वर्षेसाठी गुंतवणूक केली असेल तर ६.९ टक्के तुम्हाला व्याज मिळेल. तर २ वर्षांसाठी ७ टक्के, ३ वर्षांसाठी ७.१ टक्के आणि ५ वर्षांसाठू ७.५ टक्के व्याज दिलं जातं.
समजा तुम्ही ५ वर्षांच्या TD योजनेत ₹२ लाखांची गुंतवणूक केली, तर मुदतपूर्तीच्या वेळेस तुम्हाला एकूण ₹२,८९,९९० रुपये मिळू शकतात. यामध्ये ₹८९,९९० इतकं निश्चित व्याज मिळेल. त्यामुळे दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना योग्य मानली जाते.
टीप: ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.