

पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या योजनेच्या २३ व्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. २२ वा हप्ता शेतकर्यांना मिळाल्यानंतर आता २३ वा हप्ता आज बँक खात्यात जमा होणार आहे. नेमका हा हप्ता २० जूनला किती वाजता जमा होणार ? याबाबत अधिकृत माहिती हाती आली आहे.
शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सरकार राबवत आहे. त्यामुळे शेतीकामासाठी त्यांना आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत त्यांच्या खात्यात २२ हप्ते जमा झाले होते. तर आज २३वा हप्ता येणार आहे. या योजनेमध्ये वर्षाला एकूण ६००० रुपये दिले जातात. तर प्रत्येक हप्ता हा २००० रुपयांचा असतो. तर पीएम किसान सन्मान निधीचा कार्यक्रम पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वरजवळ होईल.
शेतकरी बऱ्याच महिन्यांपासून २३ व्या हप्त्याची वाट पाहत होते. आज अखेर तो दिवस आलाय. शेतकऱ्यांना आता किती वाजता खात्यात पैसे जमा होतील याची उत्सुकता आहे. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता हा २० जून सायंकाळी ४ वाजल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होईल.
त्यामुळे ज्यांना सकाळी हप्ता आलेला नाही त्यांनी नाराज होऊ नका. काहीच तासात हा तुमच्या खात्यात येईल. तुम्ही याची अधिकृत माहिती pmkisan.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर पाहायला मिळेल.
शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की, ज्यांना हप्ता येणार नाही त्यांनी ईकेवायसी पूर्ण केलेली नाहीये. त्यांना या योजनतून वगळ्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बिहारमध्ये मागच्या वर्षी ७३.३४ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. आता त्यातल्या ३४,००० नावं वगळ्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.