Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये पत्नी- पत्नी Joint खातं उघडून १४ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा ८६३३ व्याज मिळू शकतं. सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली ही योजना आहे.
Post Office Monthly Income Scheme
Post Office Monthly Income Schemegoogle
Published On

प्रत्येकालाचा अडचणी येतात. अडचणीच्या वेळेस जर हातात पैसा नसेल तर कोणत्याच गोष्टी करता येत नाही. यासाठी कुटुंबातली कमावणारी व्यक्ती थोडे पैसे बचत करत असते. तुम्ही जर हीच बचत पोस्टात केलीत तर तुम्हाला याचा चांगला परतावाही मिळू शकतो. नवरा- बायकोसाठी पोस्टाची पुढील योजना जबरदस्तच आहे.

पोस्टाची मंथली इनकम स्कीम (MIS) ही योजना नवरा बायकोसाठी बेस्ट आहे. या योजनेला केंद्र सरकारचा पाठींबाही मिळतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. यामध्ये एकदाच गुंतवणूक करून महिन्याला व्याज मिळतं. तर यामध्ये व्याज हे 7.4 टक्क्यांनी दिलं जातं. त्यामुळे रिटायरमेंट व्यक्ती, गृहिणी किंवा रोजचा खर्च करणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना सोयीची ठरते.

Post Office Monthly Income Scheme
Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

तुम्हाला या योजनेत वैयक्तिक खात्यासाठी 9 लाखापर्यंतगुंतवण्याची परवानगी असते. तर Joint खात्यांमध्ये तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. म्हणजे, समजा नवराबायकोने मिळून 14 लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या व्याजाच्या दरानुसार दरमहा 8,633 रुपयांपर्यंत व्याज मिळू शकतं. ही रक्कम प्रत्येक महिन्याला मिळते. त्यामुळे घरगुती खर्च तुम्हाला यातून करता येतो.

मंथली इनकम योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. मुदत पूर्ण झाल्यावर किंवा मॅच्युरिटीनंतर गुंतवलेली मूळ रक्कम तुम्ही काढू शकता. त्यामुळे भांडवल सुरक्षित राहतं आणि त्याचबरोबर महिन्याला पैसेही मिळतात. पण या योजनेत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं गरजेचं आहे. जर बचत खातं नसेल, तर सर्वात आधी ते उघडा. त्यानंतरच एमआयएस योजनेत गुंतवणूक करता येते.

टीप: गुंतवणूक करण्यापूर्वी पोस्ट ऑफिसमधील सध्याचे व्याजदर आणि नियमांची खात्री करून घ्या.

Post Office Monthly Income Scheme
Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com