LPG Rule Change: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Gas Cylinder: एलपीजी गॅस सिलिंडरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल झाला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता घरपोच गॅस सिलिंडर मिळणार आहे.
LPG Rule Change: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्व सामान्यांना मोठा दिलासा
LPG Gas Cylindersaam tv
Published On
  • एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये पुन्हा मोठा बदल

  • ग्रामीण भागात गॅस सिलिंडर घरपोच सेवा सुरू झाली

  • एलपीजी सिलिंडर बुकिंग नवीन नियम

  • भारत गॅस डिलिव्हरी पुन्हा सुरू

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आणि जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. अजूनही गॅस सिलिंडरची पुरवठा साखळी विस्कळीत आहे. अशामध्ये ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत गॅसने एलपीजी सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर विशेषत: ग्रामीण भागांमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे भारत गॅसने अनेक ठिकाणी घरपोस गॅस सिलिंडरची सुविधा थांबवली होती. आता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. भारत गॅस आधी एचपी गॅसने घरपोच गॅस सिलिंडर सुविधा उपलब्ध करून दिली. घरपोच गॅस सिलिंडर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LPG Rule Change: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्व सामान्यांना मोठा दिलासा
LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर गॅस सिलिंडरच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली. नागरिकांनी घाबरून खरेदी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे गॅस कंपन्यांनी अनेक भागांमध्ये घरपोच गॅस सिलिंडरचे वितरण बंद केले. आता अधिक कडक नियमांनुसार त्या भागांमध्ये एलपीजी सिलिंडरची घरपोच सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

LPG Rule Change: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्व सामान्यांना मोठा दिलासा
LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर बुक करण्याचे नियम अधिक कडक केले आहेत. आता ओटीपीशिवाय एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत. नवीन नियमांनुसार, तुम्हाला सर्वात आधी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करून एलपीजी सिलेंडर बुक करावा लागेल.

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी घेऊन तुम्ही डीलरकडे जाऊ शकता किंवा सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनाला तो ओटीपी दाखवू शकता. डीलर ओटीपीची पडताळणी करेल. त्यानंतरच तुम्हाला नवीन एलपीजी सिलेंडर मिळू शकेल. यासाठी तुमच्याकडे तुमचे गॅस पासबुक असणे आवश्यक आहे.

LPG Rule Change: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल, सर्व सामान्यांना मोठा दिलासा
LPG Rules 2026 Update : LPG नियमात पुन्हा बदल, पाईप गॅस कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com