Lek Ladki Yojana : राज्य सरकारकडून लाडकीला गूड न्यूज, खात्‍यावर हप्‍ता जमा; तुमच्या लेकीला लाभ मिळाला का?

Lek Ladki Yojana Maharashtra benefits details : महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभार्थी मुलींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
Lek Ladki Yojana
Lek Ladki YojanaSaam Tv
Published On

ladki Scheme Maharashtra Benefits for Girls : राज्य सरकारकडून लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत २६५१ मुलींना डीबीटीद्वारे १.३२ कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जळगावसह राज्यातील पात्र लाडक्या लेकीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लेक लाडकी योजना महिला व बाल विकास विभागामार्फत चालवली जाते. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन, खात्री देणे यासाठी १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी ही नवीन योजना सुरू झाली आहे.

मुलीचं शिक्षण आणि भविष्य आर्थिकदृष्ट्या सूकर करण्यासाठी राज्य सरकारकडून लेक लाडकी योजना (lek Ladki yojana Maharashtra) सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना सरकारकडून मदत मिळते. जळगाव जिल्ह्यातील मुलींच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६५१ लाडक्या लेकींच्या बँक खात्यावर १ कोटी ३२ लाख ५५ हजार रुपयांचा निधी डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

Lek Ladki Yojana
Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडकीच्या खात्यात किती रूपये जमा होणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

१ एप्रिल २०२३ रोजी राज्य सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींना आर्थिक लाभ दिला जातो. मुलींना जन्मापासून ते १८ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पाच टप्प्यात १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. मुलीचा जन्म झाल्यानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये, असा निधी मुलींना मिळतो.

Lek Ladki Yojana
महाराष्ट्रात भूकंप होणार, महिनाभरात ठाकरेंचे आमदार-खासदार फुटणार, मंत्र्यांच्या दाव्यानं खळबळ

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये मुलीची नोंद करावी लागते. जळगावमध्ये वर्षभरात ४ हजार ६९२ लाभार्थ्यांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी करून २ हजार ६५१ मुलींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे. लेक लाडकी योजना सुरू झाल्यानंतर योजनेतील लाभार्थी संख्‍येत वाढ होत आहे. फक्त जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ९४४ अंगणवाड्यांमधून आतापर्यंत १५ हजारपेक्षा अधिक मुलींची नोंदणी झाली आहे. यापैकी ९ हजार ९४१ लाभार्थ्यांना लाभ मिळाला होता. आता त्यात २ हजार ६५१ मुलींची भर पडली आहे. या मुलींच्या खात्यात १ कोटी ३२ लाख रूपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे.

Lek Ladki Yojana
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीचा भडका उडाला, आज प्रतितोळा इतक्या रूपयांवर आले; सुवर्णनगरीत आजचे दर काय?

अटी व शर्ती

  • पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यांनतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

  • पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

  • लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक लाहील.

  • लाभार्थी बॅंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला

  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे)

  • लाभार्थी आधार कार्ड

  • पालकांचे आधार कार्ड

  • बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॅाक्स व CKYC झालेबाबत बॅकेचा दाखला (बॅक खाते आधार कार्डशी संलग्न)

  • रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी साक्षांकित प्रत

  • लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो

Lek Ladki Yojana
यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार; eKYC वर बोलताना आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com