चेतन व्यास| वर्धा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
Operation Tiger Maharashtra political crisis : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार एका महिन्यात फुटणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ते वर्धा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेला दुजोरा देत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. पुढील एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल, असे सूचक विधानही यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याची बातमी प्रसारात झाली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने याला आणखी बळ मिळलेय.
एका महिन्यात तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल. उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदार काय आमदार काय हे सर्व पहिल्यापासून आमच्या संपर्कात आहेत. निवडणूक झाली तेव्हापासून सर्वजण संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर केव्हा करायचं, हे एकनाथ शिंदेसाहेब योग्य वेळेला निर्णय घेतील, असे शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे कुणाला भेटत नाहीत, कुणासोबत बोलत नाहीत, कुणाच्या अडचणी समजून घेत नाहीत, त्यामुळेच आम्ही उठाव केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे खासदार-आमदार आहेत, पण त्यांच्या पक्षांमध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार-आमदारांची नाही. त्यांना सर्वात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे एकनाथ शिंदे आहेत. म्हणून एका महिन्यात तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
जगू तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच. मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. जर बैठक झाली असेल तर फोटो प्रसारित करावेत, असे आव्हानही त्यांनी केले. शिवसेनेशी प्रतारणा म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे आहे. उद्धव ठाकरे यांच्या एका फोनवर मी मंत्रीपदही सोडले होते. मानहानी खटला दाखल करण्याचा इशारा सावंत यांनी यावेळी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.