Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीचा भडका उडाला, आज प्रतितोळा इतक्या रूपयांवर आले; सुवर्णनगरीत आजचे दर काय?

gold price today in Jalgaon per tola : जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹1000 ने वाढून ₹1.55 लाखांवर पोहोचलं असून चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली आहे.
Gold rate today India
Gold rate today India साम टीव्ही मराठी
Published On

Jalgaon bullion market gold silver update : आखाती देशात सुरू असलेले इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध तात्पुरते थांबवण्यात आले. याचा थेट परिणाम कच्चे तेल आणि सोन्याच्या दरावर पडला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात चढउतार सुरूच होती. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. जळगाव, मुंबई, पुण्यापासून दिल्ली आणि चेन्नईसह जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळगावमधील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात आज प्रति तोळा तब्बल एक हजार रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दीड लाखांच्या खाली आलेले सोनं पुन्हा एकदा उच्चांकी दराकडे जात असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी जळगावात सराफ बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर चांदीचा दरही प्रति किलो पाच हजार रूपयांनी वाढला आहे. गुरूवारी जळगावच्या सोन्याच्या मार्केटमध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर घसरले होते. पण आज सराफा बाजार उघडात सोन्याची किंमत वाढल्याची नोंद झाली आहे. आखाती देशातील युद्ध थांबल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी नोंदवला होता.

Gold rate today India
यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार; eKYC वर बोलताना आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

मुंबई, पुण्यासह जळगावमधील सराफा बाजारत आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा एक हजार रूपयांनी वाढून एक लाख ५५ हजार १५ रूपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह ५ हजारांनी वाढून २ लाख ५२ हजार ३५० रुपयांवर पोहचले आहेत. इराण-इस्त्राइलमधील युद्धविरामाची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारपासून सोन्याचे आणि चांदीच्या दरात बदल होत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

Gold rate today India
१७ एप्रिलपासून नियम बदलणार; HSRP प्लेट नसेल तर गाडीचे काम अडकणार, ₹१०००० चा दंडही बसणार

सोन्याचे तर सव्वालाखांवर येणार ?

आज सोन्याचे दर वाढले आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा सोने दरावर परिणाम झालेला आहे. जर युद्ध पुढे नाही थांबले तर नाही सोने दर १ लाख ८० पर्यंत दर वाढतील आणि युद्ध थांबले तर सव्वा लाखांवर येईल असा अंदाज पुण्यातील सोने व्यापारी फत्तेचंद रांका यांनी वर्तवला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा सोने दरावर परिणाम परिणाम होतो, तो झालेला आहे.

आपल्याला सोने बाहेरून येते, आयात बंद होती युद्ध काळात त्यामुळे आता परत आयात सुरू झाली, तर सोने दर कमी होतील पण हे सगळे किती दिवस चालते यावर दर कमी जास्त होतील. आपल्या देशात सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे आता युद्ध काही दिवस थांबवले आहे. पुढे काय होते यावर परत सोने दर कमी जास्त होऊ शकतात, असेही फत्तेचंद रांका म्हणाले.

Gold rate today India
भररस्त्यात गंदी बात! धावत्या दुचाकीवरील तरुणीच्या टॉपमध्ये घातला हात, तरुणांची विकृती; Viral VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com